राक्षसभुवनचे शनी मंदिर आणि पांचाळेश्वरचे आत्मतीर्थ मंदिर पाण्याखाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2020 05:19 PM2020-09-08T17:19:44+5:302020-09-08T17:20:22+5:30
प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
गेवराई : पैठण येथील नाथसागर जलाशय ९८ % भरल्याने धरणाचे १८ दरवाजे अर्धा फुटाने उघडुन गोदावरी नदी पात्रात १४ हजार क्युसेस पाणी सोडले जात आहे. जलविद्युत केद्र १५८९ क्युसेस, उजवा कालवा ६०० क्युसेस, डावा १००० क्युसेस असा पाण्याचा विसर्ग होत असल्याने गोदावरी नदी दुथडी भरून वाहात आहे. यामुळे पाचांळेश्वर येथील आत्मतिर्थ मंदिर व राक्षसभुवन येथील शनि मंदिर पाण्याखाली गेले आहे.
जायकवाडी धरणातून पाण्याचा मोठ्याप्रमाणावर विसर्ग होत असल्याने गेवराई तालुक्यातील ३२ गावातून जाणारी गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे. पाणी पातळी वाढल्याने तिर्थक्षेत्र असलेल्या पांचाळेश्वर येथील आत्मतिर्थ दत्त मंदिर पूर्णपणे पाण्याखाली गेले आहे. तर शनिच्या साडेतीन पिठा पैकी एक पिठ असलेल्या राक्षसभुवन येथील शनि मंदिरातील मुर्ती पाण्यात बुडाल्या आहेत. भाविकांनी नदी पात्रातील मंदिरात न जाण्याचे आवाहन पाचांळेश्वर येथील मंहत विजयराज गुर्जर बाबा व भावीकराज बाबा यांनी केले आहे. तसेच प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. आपत्कालीन स्थितीसाठी महसुलचे पथके तयार असल्याचे तहसिलदार सुहास हजारे यांनी सांगितले.