राक्षसभुवन येथे शनिजन्मोत्सव सोहळा उत्साहात; जयघोषात घेतले भाविकांनी दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2022 07:01 PM2022-12-30T19:01:02+5:302022-12-30T19:01:58+5:30

यावेळी विविध फुलांनी मंदिराची सजावट करण्यात आली होती

Shanijanmatsava celebration at Rakshasbhuvan; Devotees took darshan in cheers | राक्षसभुवन येथे शनिजन्मोत्सव सोहळा उत्साहात; जयघोषात घेतले भाविकांनी दर्शन

राक्षसभुवन येथे शनिजन्मोत्सव सोहळा उत्साहात; जयघोषात घेतले भाविकांनी दर्शन

googlenewsNext

- सखाराम शिंदे 
गेवराई (बीड) :
भारतातील शनीच्या साडेतीन पीठापैकी एक मुख्य पीठ  असलेल्या तालुक्यातील श्रीक्षेञ राक्षसभुव येथे शनी जन्मोत्सव सोहळा आज सायंकाळी ६ वाजता मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शेखाडो भाविकांनी जयघोषात शनी महाराजांचे दर्शन घेतले.

जन्मोत्सवानिमित्त सकाळी मंदिरात अखंड तेलात्मक अतिरुद्ध तैलधारात्मक अभिषेकाची सांगता झाली. त्यानंतर महाअभिषेक करण्यात आला. यावेळी मंदिर पाना-फुलांनी, रांगोळी काढून सजविण्यात आले होते. सायंकाळी ४ ते ६ यावेळेत रेणुकादास गणपत शास्त्री पाठक यांचे किर्तन झाले. तर सायंकाळी ६ वाजता जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. तसेच उद्या शनिवारी सकाळी १२ ते ५ यावेळेत महाप्रसादासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन देवस्थान ट्रस्ट कमिटीचे अध्यक्ष संतोष काटवटे व सचिव सुरेंद्रकुमार पाठक यांनी केले आहे.

Web Title: Shanijanmatsava celebration at Rakshasbhuvan; Devotees took darshan in cheers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Beedबीड