शंतनू वाईट काम करू शकत नाही : हेमलता मुळूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:40 AM2021-02-17T04:40:11+5:302021-02-17T04:40:11+5:30

दिल्ली पोलिसांनी अचानक केली चौकशी : शंतनूवर केलेल्या आरोपात तथ्य नाही बीड : दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला ...

Shantanu can't do bad things: Hemalatha Muluk | शंतनू वाईट काम करू शकत नाही : हेमलता मुळूक

शंतनू वाईट काम करू शकत नाही : हेमलता मुळूक

Next

दिल्ली पोलिसांनी अचानक केली चौकशी : शंतनूवर केलेल्या आरोपात तथ्य नाही

बीड : दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण लावल्याचा आरोप करत दिल्ली पोलिसांनी बीडमधील पर्यावरणवादी कार्यकर्ता शंतनू शिवलाल मुळूक यांच्यावर गुन्हा दाखल केला. त्यानंतर त्यांच्या घरच्या मंडळीची देखील चौकशी दिल्ली पोलिसांनी केली. यावेळी माध्यमांशी बोलताना शंतनू यांच्या आई हेमलता मुळूक यांनी म्हटले आहे की, ‘शंतनू कुठलाही वाईट काम करूच शकत’ याचा मला विश्वास आहे. मी देखील एक शेतकऱ्याची मुलगी आहे, म्हणून शेतकरी आंदोलनाला पाठिंबा तर असणारच, त्यामुळे शंतनूवर केलेल्या आरोपात तथ्य नाही.

कृषी कायद्याविरोधात सुरू असलेल्या दिल्ली येथील आंदोलनादरम्यान प्रजासत्ताकदिनी दिल्लीत हिंसक प्रकार घडला. आंदोलनादरम्यान ‘टूलकिट’चे प्रकरण समोर आले होते. यामध्ये बीड येथील शंतनू शिवलाल मुळूक या तरुणावरही दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला. दिल्ली येथील पोलिसांचे एक पथक मागील चार-पाच दिवसांपासून बीडमध्ये तळ ठोकून होते. यासंदर्भात बीड येथील पोलिसांना काहीही माहिती नसल्याची प्रतिक्रिया पोलीस अधीक्षक आर. राजा यांनी दिली.

मात्र, दोन- तीन दिवसांपूर्वी पहाटेच्या दरम्यान दिल्ली पोलिसांनी आमच्या घरी येऊन शंतनूसंदर्भात चौकशी केली. त्यानंतरच आम्हाला कळले, काही तरी झालेले आहे. मात्र, शंतनू चुकीचे काम करणार नाही, असा विश्वास आहे, असे मत शंतनूची आई हेमलता मुळूक यांनी व्यक्त केला. दरम्यान, बीड येथील पर्यावरणवादी कार्यकर्त्यावर दिल्ली पोलिसांनी केलेल्या कारवाईबद्दल बीड येथील शेतकरी संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अशा पद्धतीने शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या समाजिक कार्यकर्त्यांना केंद्र सरकार जाणूनबुजून त्रास देत असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे यांनी ‘लोकतम’शी बोलताना केला. तसेच शेतकऱ्यांना पाठिंबा दिला म्हणून अशी सूडबुद्धीने कारवाई केली जात असेल, तर जिल्ह्यात व राज्यात आंदोलन केले जाईल, असा इशारादेखील त्यांनी दिला आहे.

Web Title: Shantanu can't do bad things: Hemalatha Muluk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.