लक्ष्मीसह बहिणींच्या जीवनात शांतिवनची ‘प्रकाशज्योत’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2019 12:24 AM2019-10-28T00:24:08+5:302019-10-28T00:24:31+5:30

शिरुर कासार तालुक्यातील आर्वी येथील शांतिवन प्रकल्पाने आईच्या मृत्यूनंतर एकाकी पडलेल्या लक्ष्मीसह तिच्या दोन बहिणींना दत्तक घेत दिवाळी सार्थक केली.

Shantivan's' light of light 'in sisters' life with Lakshmi | लक्ष्मीसह बहिणींच्या जीवनात शांतिवनची ‘प्रकाशज्योत’

लक्ष्मीसह बहिणींच्या जीवनात शांतिवनची ‘प्रकाशज्योत’

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : शिरुर कासार तालुक्यातील आर्वी येथील शांतिवन प्रकल्पाने आईच्या मृत्यूनंतर एकाकी पडलेल्या लक्ष्मीसह तिच्या दोन बहिणींना दत्तक घेत दिवाळी सार्थक केली. या तिन्ही मुली आता शांतिवनात राहणार असल्याची माहिती संचालक दीपक नागरगोजे यांनी दिली.
वंचित उपेक्षित घटकांतील मुलांना शिक्षण देऊन तसेच नोकरी मिळवून देत समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांचे जीवनमान उंचावण्याचे काम शांतिवन प्रकल्पाच्या माध्यमातून दीपक व कावेरी नागरगोजे हे दांपत्य २० वर्षांपासून करत आहे. हा प्रकल्प राज्यातील मोजक्या उत्कृष्ट सामाजिक प्रकल्पांपैकी एक आहे. वंचित, आधाराची गरज असलेल्या मुलांची माहिती मिळताच शांतिवन त्यांना आसरा देते. दीपावलीच्या पूर्वसंध्येला तीन मुलींना शांतिवनने आधार दिला.
तागडगाव येथील तुकाराम आधापुरे यांची पत्नी वैशाली यांचे काही दिवसांपूर्वी आजारपणामुळे निधन झाले. त्यांना श्रावणी (वय ७), लक्ष्मी (वय ६) आणि आरती (वय ४) या तीन मुली. आईच्या अकाली निधनाने या मुली उघड्यावर पडल्या. गरिबी, इतरांच्या शेतात काम करून उदरिनर्वाह करणाऱ्या तुकाराम यांच्या समोर मुलींच्या पालन पोषणाचा प्रश्न होता. ही बाब दीपक नागरगोजे यांना कळताच त्यांनी संपूर्ण माहिती घेत या मुलींना शांतिवनात आणून त्यांना आधार दिला.
दीपावली जसा प्रकाशाचा उत्सव तसा लक्ष्मीच्या पूजनाचाही! तीन बहिणींना परिवारात सहभागी करत वंचितांच्या आयुष्यात आनंदाची प्रकाशज्योत प्रज्वलीत करुन आदर्श निर्माण करणा-या शांतिवनच्या या निर्णयाचे स्वागत होत आहे.

Web Title: Shantivan's' light of light 'in sisters' life with Lakshmi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.