शिरूरमध्ये चोरट्यांनी एकाच रात्री ८ घरे फोडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2019 12:14 AM2019-03-24T00:14:36+5:302019-03-24T00:15:10+5:30
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आता चोरटे सक्रिय झाल्याचे प्रत्यंतर शुक्रवारी मध्यरात्रीनंतर आले. एकाच रात्रीतून आठ घरे फोडण्याचा विक्र मी प्रयोग केला गेला; मात्र त्यांच्या हाती फारसे काही लागले नसल्याची चर्चा आहे .
शिरूर कासार : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आता चोरटे सक्रिय झाल्याचे प्रत्यंतर शुक्रवारी मध्यरात्रीनंतर आले. एकाच रात्रीतून आठ घरे फोडण्याचा विक्र मी प्रयोग केला गेला; मात्र त्यांच्या हाती फारसे काही लागले नसल्याची चर्चा आहे .
शुक्रवारी संत तुकाराम बीजेचा मुहूर्त निवडून शुक्र वारी मध्यरात्रीनंतर शहरातील सुतार नेट ते जुना वाडा चौक या भागात सुरेश थोरात, ज्ञानेश्वर गाडेकर, रत्नाबाई दगडे, दिनकर गाडेकर, आदिनाथ गाडेकर, दादा गायके व अन्य घरांचे दरवाजे फोडून, कुलूप-कोंडे तोडून घरात चाफागोदा केला. त्यात दिनकर गाडेकर यांच्या पॅन्टीच्या खिशातील दोन हजार रुपये पळवल्याचे सांगितले गेले. रत्नाबाई दगडे यांचे चॅनल गेट तोडून घरातील कपड्यांची उचकाउचकी केली. ज्ञानेश्वर गाडेकर यांच्या घरातून ही किरकोळ सोन्याशिवाय फारसे हाती लागले नसल्याची चर्चा आहे.
पोलीस जागृत राहून सतत घसरत घालण्याचे काम करीत आहेत. नागरिकांनी देखील सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. आपल्या गल्लीत रक्षक दलाची नेमणूक करावी. त्यांना पुरेपूर सहकार्य केले जाईल, असे पोलीस निरीक्षक सतीश वाघ यांनी सांगितले.