‘शिकच, शिकावच, शिके राज घडावच...।’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:34 AM2021-02-16T04:34:05+5:302021-02-16T04:34:05+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बीड : ‘शिकच, शिकावच शिके राज घडावच। शिक जेरी साज पोळी ज्यादा शिक जेन घियेर कचोळी, ...
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : ‘शिकच, शिकावच शिके राज घडावच। शिक जेरी साज पोळी ज्यादा शिक जेन घियेर कचोळी, शिक्षनेती कुळीर उद्धार वे जावं छ।’ म्हणजेच ‘जो शिकेल, तोच शिकवू शकेल व तेच राज्य निर्माण करू शकतात, उच्च शिक्षणानेच पिढ्यानपिढ्यांचा उद्धार होतो.’ अशी शिकवण देत संत सेवालाल महाराजांनी शिक्षणाचे महत्त्व २५० वर्षांपूर्वी जगाला पटवून दिले. आज अनेक समाज शिक्षणाच्या प्रवाहापासून लांब आहेत, त्यांच्यासाठी काम करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन डॉ. जगन्नाथ चव्हाण यांनी केले.
येथील श्री बंकटस्वामी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने संत सेवालाल महाराज जयंती साजरी करण्यात आली, यावेळी डॉ. चव्हाण बोलत होते.
यावेळी प्राचार्य डॉ. विवेक मिरगणे व उपप्राचार्य डॉ. शिवाजी मोरे यांनी संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी सुनील त्रिभुवन यांनी केले तर कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक प्रमोद जाधव यांनी आभार मानले. कार्यक्रमाला विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.