शिरूरकासार नगरपंचायत सुरेश धस यांच्या ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 12:31 AM2018-12-13T00:31:54+5:302018-12-13T00:32:08+5:30
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी पार पाडलेली नगरपंचायतची निवडणूक प्रक्रिया सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवण्याचा निर्णय आहे. त्यामुळे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या ताब्यातील नगरपंचायत आमदार सुरेश धस यांच्या ताब्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरूर : सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी पार पाडलेली नगरपंचायतची निवडणूक प्रक्रिया सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवण्याचा निर्णय आहे. त्यामुळे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या ताब्यातील नगरपंचायत आमदार सुरेश धस यांच्या ताब्यात आली आहे.
नगर परिषद अध्यक्ष निवडीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे गटाला धक्का बसला असून, आमदार सुरेश धस गटात आनंदाचे वातावरण आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचा आमदार सुरेश धस समर्थकांनी फटाके वाजवून आणि पेढे वाटून आनंद साजरा केला आहे. सर्वसाधारण बैठकीच्या निमित्ताने निवडणुकीची प्रक्रिया पीठासीन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, गणेश निºहाळी यांच्या उपस्थितीमध्ये ५ डिसेंबर रोजी पार पडली होती.
१७ नगरसेवक सदस्य संख्या असलेल्या नगरपंचायतमध्ये फेरनगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष पदासाठी गल्ली ते दिल्लीपर्यंत गाजलेल्या निवडणुकीत न्यायलयाच्या निर्णयामुळे चुरस पाहयला मिळाली. आमदार सुरेश धस आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी प्रतिष्ठेची केलेल्या नगरपंचायत मध्ये १५ नगरसेवकांनी मतदान केले होते.
सुरेश धस गटाकडून मीरा गाडेकर यांनी तर धनंजय मुंडे गटाकडून विद्यमान नगराध्यक्ष रोहिदास पाटील यांनी अध्यक्षपदासाठी आपले नामनिर्देशन पत्र दाखल केले होते. सदरील निवडणुकीचा निकाल सर्वोच्च न्यायलयाने १२ डिसेंबर पर्यंत घोषित करू नयेत असे आदेश दिल्यामुळे निकाल राखीव ठेवण्यात आलेला होता.
१२ डिसेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालात ५ डिसेंबर रोजी झालेली निवडणूक प्रक्रिया कायम राहणार असल्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे मीरा गाडेकर यांना ९ तर रोहिदास पाटील गाडेकर यांना ६ मते मिळाली आहेत त्यामुळे सुरेश धस गटाच्या मीरा गाडेकर नगराध्यक्ष असणार आहेत.
मीरा गाडेकर नगराध्यक्षा
आ.सुरेश धस राष्ट्रवादी पक्षातून बाहेर पडल्यानंतर शिरुर नगर परिषदेतील राष्ट्रवादीत फूट पडली होती त्यामुळे न.प. अध्यक्ष पदासाठी फेरनिवडणूक घेण्यात आली. यामध्ये धस गटाक डून मीर गाडेकर यांनी ९ मत मिळवत धनंजय मुंडे यांच्या गटाचे रोहिदास पाटील गाडेकर यांचा पराभव केला.