पीडितेला न्याय देण्यासाठी शिरुर बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2019 11:47 PM2019-12-31T23:47:25+5:302019-12-31T23:48:09+5:30
दोन दिवसांपूर्वी मानूरजवळील हनुमानवाडी येथे एका ११ वर्षीय अल्पवयीन मुलीवर एकवीस वर्षीय तरूणाने अत्याचार केला होता. पीडित बालिका उपचार घेत आहे.
शिरुर कासार : दोन दिवसांपूर्वी मानूरजवळील हनुमानवाडी येथे एका ११ वर्षीय अल्पवयीन मुलीवर एकवीस वर्षीय तरूणाने अत्याचार केला होता. पीडित बालिका उपचार घेत आहे.
त्या निंदनीय घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी व पीडितेला न्याय, आरोपीला कठोर शासन देण्यासाठी मंगळवारी बंद पाळण्यात येवून जीजामाता चौक ते पोलीस स्टेशनपर्यंत मूक मोर्चा काढण्यात आला. यात शालेय विद्यार्थिनींबरोबर महिला व लोकप्रतिनिधींसह अन्य सहभागी झाले होते. अडीच ते तीन हजार लोकांचा मूक आक्र ोश मोर्चा शांततेत पार पडला. सावधगिरी म्हणून पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता. पीडित बालिकेच्या घरी जाऊन सुरेश धस यांनी धीर दिल्यानंतर ते या मोर्चात सहभागी झाले होते. मुलींच्या हस्ते पोलीस निरीक्षक सुरेश खाडे यांना निवेदन दिले. पोलीस तपासावर समाधान व्यक्त करत आता आरोपीला अटकही झाली आहे. बंद मागे घेऊन आपले व्यवहार सुरू करण्याच्या आवाहनानंतर दुकान सुरु झाले. सभापती म्हणून निवड झालेल्या उषा सरवदे यांचेसह पानसंबळ, शिरूर न.पं. अध्यक्षा मीरा गाडेकर, नगरसेविका वर्षा सानप, अश्विनी भांडेकर, आशा शिंदे, कुसुम हरिदास या व कालिका देवी महाविद्यालयाच्या प्राध्यापिका हातात निषेध फलक घेऊन सहभागी होत्या. शेवटी आ. सुरेश धस यांचेसह नगराध्यक्ष रोहिदास पाटील, दत्ता पाटील, शिवाजी पवार, उपनगराध्यक्ष प्रकाश देसरडा, ज्येष्ठ नेते दशरथ वनवे, सुरेश उगलमुगले, कल्याण तांबे, नगरसेवक दादा हरिदास, गणेश भांडेकर आदी सहभागी होते.