शिरूरला पावसाचा फटकारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:36 AM2021-04-28T04:36:22+5:302021-04-28T04:36:22+5:30

शिरूर कासार : दिवसभर असह्य उकाडा आणि दुपारच्या पुढे आकाशात ढग गोळा होऊन मंगळवारी सायंकाळच्या सुमारास पावसाचा फटकारा ...

Shirur hit by rain | शिरूरला पावसाचा फटकारा

शिरूरला पावसाचा फटकारा

Next

शिरूर कासार : दिवसभर असह्य उकाडा आणि दुपारच्या पुढे आकाशात ढग गोळा होऊन मंगळवारी सायंकाळच्या सुमारास पावसाचा फटकारा आल्याने वातावरणात थंडावा निर्माण झाला होता. पावसाला जोर नसला, तरी आलेल्या फटकऱ्याने उकाडा मात्र कमी झाला होता, तर शेतकरी मात्र पुन्हा पीक नुकसानीच्या भीतीने धास्तावला.

कोरोना रुग्णसंख्येत वाढ, चिंता कमी होईना

शिरूर कासार : सोमवारी तालुक्यात अवघे २१ रुग्ण निघाल्याने थोडा दिलासा मिळाला होता. मात्र, मंगळवारी तब्बल ८२ रुग्ण आढळून आले. कडक लाॅकडाऊन हा शब्दच गुळगुळीत झाल्याने कोरोनाची गती कमी होत नाही, त्यातच घरीच विलगीकरण केलेले पथ्य सांभाळत नाही. बाधित कुटुंबाचे सदस्य या ना त्या कारणाने मुक्त संचार करताना दिसत आहेत.

डासांचा वाढता उपद्रव

शिरूर कासार : तालुक्यात मागील दोन आठवड्यांपासून डासांचा वाढता प्रादुर्भाव त्रासाचा ठरत आहे. आधीच कोरोनाने भेदरून सोडले आहे. बाहेर फिरता येत नाही. वीजपुरवठा खंडित झाल्यास कित्येक डास घरी बसू देत नसल्याने, नागरिकांना दुहेरी त्रासाला सामोरे जावे लागत आहे. नगरपंचायतीने डास प्रतिबंधक उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

शिरूरकरांना अशुद्ध पाण्याचा पुरवठा

शिरूर कासार : शहरात नगरपंचायतद्वारे होणारा पाणीपुरवठा हा शुद्ध नसल्याने नाविलाजाने जार किंवा बाहेरून पाणी पिण्यासाठी आणावे लागत आहे. शहराला होणारा पाणीपुरवठा आरोग्यास घातक ठरत असला, तरी फारसे गांभीर्य घेतले जात नसल्याचे दिसत आहे. पाणी गढूळ अथवा पिवळसर माती, धूळ मिश्रित असल्याने पिण्याचे धाडस कोणी करत नाही, कोरोना संक्रमण काळात शुद्ध पाणीपुरवठा व्हावा, अशी मागणी होत आहे.

Web Title: Shirur hit by rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.