शिरुर कासारला अजस्त्र अजगरावर ‘सर्पराज्ञी’त उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 12:59 AM2017-12-11T00:59:49+5:302017-12-11T00:59:57+5:30

बीड -अहमदनगर जिल्ह्याच्या सीमेवर बेलपारा प्रकल्पाच्या पायथ्याशी ऊसाच्या शेतात १० फूट लांब व २५किलो वजनाचा अजस्त्र अजगर ८ डिसेंबर रोजी जखमी अवस्थेत आढळून आला होता. त्यास वाईड लाइफ प्रोटेक्शन अँड सॅक्टयुअरी असोसिएशनच्या कार्यकर्त्यांनी पकडून वनविभागाच्या मदतीने तागडगाव येथील सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्रात दाखल केले.

Shirur Kasar treatment on 'Ajmer serpent' | शिरुर कासारला अजस्त्र अजगरावर ‘सर्पराज्ञी’त उपचार

शिरुर कासारला अजस्त्र अजगरावर ‘सर्पराज्ञी’त उपचार

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
शिरुर कासार : बीड -अहमदनगर जिल्ह्याच्या सीमेवर बेलपारा प्रकल्पाच्या पायथ्याशी ऊसाच्या शेतात १० फूट लांब व २५किलो वजनाचा अजस्त्र अजगर ८ डिसेंबर रोजी जखमी अवस्थेत आढळून आला होता. त्यास वाईड लाइफ प्रोटेक्शन अँड सॅक्टयुअरी असोसिएशनच्या कार्यकर्त्यांनी पकडून वनविभागाच्या मदतीने तागडगाव येथील सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्रात दाखल केले. त्यावर हे उपचार करत आहेत.
अजगर आढळल्याची माहिती वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन अँड सॅक्टयुअरी असोसिएशनचे अध्यक्ष सिद्धार्थ सोनवणे यांना भ्रमणध्वनीवरुन मिळाली. सोनवणे व अमोल ढाकणे यांनी घटनास्थळी धाव घेऊन त्या अजगरास पकडले.

अजगर आजारी असल्याचे स्पष्ट दिसून येत असल्याने त्यास विभागीय वन अधिकारी अमोल सातपुते, वनपरिक्षेत्र अधिकारी अशोक काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्पराज्ञी पुनर्वसन केंद्रात वनरक्षक विजय केदार, शिवाजी आघाव यांनी दाखल केले. या अजगरावर सध्या पशुवैद्यकीय अधिकारी डॉ विजय चौरे, डॉ. निलेश सानप हे उपचार करत आहेत. या अजगराची शुश्रूषा सर्पराज्ञीच्या संचालिका सृष्टी सोनवणे ह्या करत आहेत.

अधिका-यांचेही सहकार्य
अजगराच्या प्रकृतीत मोठ्या प्रमाणावर सुधारणा होत असून लवकरच ते बरे होईल. पूर्ण बरे झाल्यानंतर या अजगरास त्याच्या मूळ अधिवासात सोडून देण्यात येईल. वनविभागाच्या अधिकाºयांचेही सहकार्य आहे.
- सृष्टी सोनवणे
संचालिका, सर्पराज्ञी प्रकल्प

तपासणीनंतरच होणार अजगराच्या आजाराचे निदान
अजगराची हालचाल मंद झालेली आहे, त्याच्या मलमूत्राचाही उग्र वास येत आहे. अन्नही खात नसल्याने त्याच्या या बाह्यलक्षणांवरून त्यास अमेबिअसिसची लागण झाल्याचे जाणून येत आहे. त्याचे अचूक निदान करण्यासाठी त्याच्या मलमूत्राची तपासणी करावी लागणार आहे. या तपासणीनंतरच योग्य तो निष्कर्ष काढण्यात येईल.
- डॉ. विजय चौरे, पशुवैद्यकीय अधिकारी

Web Title: Shirur Kasar treatment on 'Ajmer serpent'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.