बीड विधानसभेची जागा महायुतीसोबत शिवसंग्रामच लढवणार-आहेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2019 12:30 AM2019-09-05T00:30:56+5:302019-09-05T00:32:46+5:30
महायुतीबाबत वरिष्ठ पातळीवर बोलणी सुरू असून प्राथमिक चर्चा झालेली आहे. शिवसंग्रामने राज्यात १२ जागांची मागणी केली असून यात बीडचाही समावेश आहे. बीडची जागा शिवसंग्रामलाच मिळेल, असा विश्वास युवक प्रदेशाध्यक्ष उदयकुमार आहेर यांनी व्यक्त केला.
बीड : महायुतीबाबत वरिष्ठ पातळीवर बोलणी सुरू असून प्राथमिक चर्चा झालेली आहे. शिवसंग्रामने राज्यात १२ जागांची मागणी केली असून यात बीडचाही समावेश आहे. बीडची जागा शिवसंग्रामलाच मिळेल, असा विश्वास युवक प्रदेशाध्यक्ष उदयकुमार आहेर यांनी व्यक्त केला.
संवाद यात्रेनिमित्त उदयकुमार आहेर यांनी बुधवारी शिवसंग्राम भवनमध्ये युवकांशी संवाद साधला. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रभाकर कोलंगडे, मनोज जाधव यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होते.
पुढे बोलताना उदयकुमार आहेर म्हणाले, शिवसंग्रामच्या वतीने राज्यभर संवाद यात्रा सुरु आहे. यामध्ये युवकांच्या भेटीगाठी घेतल्या जात आहेत. तसेच त्यांचे प्रश्न काय आहेत. ते सोडवण्यासाठी काय उपाययोजना केल्या जाऊ शकतात, याविषयी चर्चा केली जात आहे. याच यात्रेनिमित्त ते बीडमध्ये आले होते. यावेळी त्यांनी शहरातील तसेच ग्रामीण भागातील महाविद्यालयीन तरुणांशी संवाद देखील साधला. यानिमित्ताने युवकांशी महाविद्यालयांमध्ये जाऊन तसेच बैठका, मेळावे घेऊन संवाद साधला जात आहे. त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या जात आहेत. देशात तसेच राज्यात बेरोजगारीचा प्रश्न प्रामुख्याने भेडसावत आहे. त्यामुळे रोजगाराभिमूख प्रशिक्षण व शिक्षण देण्याचे काम पक्षाच्या वतीने विविध ठिकाणी सुरु आहे. संघटनेच्या वतीने बेरोजगारांना येणाºया अडचणींची सोडवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. तसेच शासनाने सुरु केलेल्या आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या योजनेंतर्गत तसेच इतर महामंडळांच्या माध्यमातून बेरोेजगारांना उद्योग, व्यवसायासाठी कर्ज पुरवठा करण्याबाबत आ. विनायक मेटे प्रयत्नशील असल्याचे आहेर यांनी सांगितले.