शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शिवसेना आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2019 12:11 AM2019-11-26T00:11:22+5:302019-11-26T00:16:22+5:30

जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी तसेच विनाअट पीक विमा सरसकट मंजूर करावा इ. मागण्यांसाठी शिवसेनेतर्फे सोमवारी जिल्हाभरात आंदोलन करण्यात आले.

Shiv Sena aggressive on farmers' question | शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शिवसेना आक्रमक

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शिवसेना आक्रमक

Next
ठळक मुद्देजिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन : तालुक्यांमध्ये तहसील कार्यालयासमोर निदर्शने; प्रशासनास निवेदन सादर

बीड : जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी तसेच विनाअट पीक विमा सरसकट मंजूर करावा इ. मागण्यांसाठी शिवसेनेतर्फे सोमवारी जिल्हाभरात आंदोलन करण्यात आले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, संपर्क प्रमुख आनंद जाधव यांच्या आदेशावरून जिल्हा प्रमुख सचिन मुळूक, कुंडलिक खांडे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध घोेषणाबाजी करत निदर्शने झाली.
आॅक्टोबरमध्ये परतीच्या तसेच अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आकडा ५०० कोटीपेक्षा जास्त आहे. अशा संकटकाळात शेतकºयांना दिलासा मिळावा म्हणून विविध मागण्यांसाठी सोमवारी हे आंदोलन करुन प्रशासनाला निवेदन ेदण्यात आले. जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे, योगेश क्षीरसागर, विलास शिंदे, जि. प.सदस्य गणपत डोईफोडे, परमेश्वर सातपुते, बप्पासाहेब घुगे, संगीता चव्हाण, नितीन धांडे, चंद्रकला बांगर, बंडू पिंगळे, आशिष मस्के, गोरख सिंघन, राजेंद्र राऊत, अरुण बोंगाणे, सुनील सुरवसे सह शिवसैनिक व शेतकरी उपस्थित होते.
गेवराईत प्रशासनाला निवेदन
गेवराई : येथे माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली निदर्शने करुन तहसीलदारांना निवेदन दिले. यावेळी रोहित पंडित, तालुका प्रमुख कालिदास नवले, दिनकर शिंदे, महादेव औटी, नंदू गाडे, महादेव खेत्रे, सतीश सपकाळ आदी उपस्थित होते.
परळी तहसीलसमोर निदर्शने
परळी : येथील तहसील कार्यालयावर निदर्शने करून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यावेळी शिवसेना तालुका प्रमुख व्यंकटेश शिंदे, शहर प्रमुख राजेश विभूते, जिल्हा सहसंघटक रमेश चौंडे, युवासेना तालुका समन्वयक संतोष चौधरी, उपशहर प्रमुख मोहन राजमाने, युवा शहर अधिकारी कृष्णा सुरवसे, उपतालुका प्रमुख पप्पू नाटकर, विद्यार्थी सेना शहर संघटक गजानन कोकीळ, अश्रूबा काळे, कैलास कावरे, तुकाराम नरवाडे, अनिल शिंदे, विकास पवार, योगेश सातपुते, वैजनाथ सलगर, विष्णू सलगर, संजय सोमाणी, अक्षय राऊत शिवसैनिक सहभागी झाले होते.
केजमध्ये मोर्चा निदर्शने
केज : येथील तहसील कार्यालयावर मोर्चा काढून जोरदार निदर्शने झाली.आंदोलनात महिला आघाडीच्या जिल्हा सहसंपर्क प्रमुख रत्नमाला मुंडे, युवासेना तालुका प्रमुख अरविंद थोरात, शहरप्रमुख अनिल बडे, बाळू पवार, तालुका संघटक अशोक जाधव, रामहरी कोल्हे, अभिमान पटाईत, अभिमान घाटूळ, तात्या रोडे हे सहभागी झाले होते.
धारुरमध्ये घोषणाबाजी, निदर्शने
धारुर : येथील तहसील कार्यालयावर मोर्चा काढून निदर्शने करीत घोषणाबाजी केली. विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना दिले. उपजिल्हाप्रमुख, शिवसेना तालुकाप्रमुख नारायण कुरुंद, शहरप्रमुख बंडू शिनगारे, माजी ता. प्रमुख विनायक ढगे, राजकुमार शेटे, माजी उपनगराध्यक्ष आनंत चिंचाळकर, नगरसेवक यशवंत गायके, बंडू बप्पा सावंत, सुनिल भांबरे, नितीन सद्दीवाल, गणेश पवार, संजय पंडित, पुरुषोत्तम सोळंके, सय्यद रियाजसह शिवसैनिक, शेतकरी आंदोलनात सहभागी होते.
माजलगावात निदर्शने
माजलगाव : येथील तहसील कार्यालयासमोर शिवसैनिकांनी निदर्शने केली. उपजिल्हाप्रमुख सुशील पिंगळे यांच्या नेतृत्वाखाली तालुकाप्रमुख आप्पासाहेब जाधव, सुनील खंडागळे, शहरप्रमुख पापा सोळंके, तुकाराम येवले, महिला आघाडीच्या शारदा डोईजड, सूरज गवरकर, शुभम डाके, मनोज थेटे, दिगंबर सोळंके, अभिजित कोंबडे, प्रशांत टमके हे सहभागी होते. आंदोलनानंतर तहसीलदार डॉ. प्रतिभा गोरे यांना निवेदन देण्यात आले.
अंबाजोगाईत मोर्चा
अंबाजोगाई : तालुका शिवसेनेच्या वतीने सोमवारी येथील तहसील कार्यालयावर मोर्चा निघाला. जोरदार घोषणाबाजी करीत शिवसैनिकांनी निदर्शने केली. नगर परिषदेपासून निघालेल्या मोर्चात शिवसेनेचे तालुकाप्रमुख अर्जुन वाघमारे, शहरप्रमुख गजानन मुडेगावकर, बालासाहेब शेप, वैभव आजले, अशोक गाढवे, संतोष काळे, उषा यादव, विनोद पोखरकर, अभिमन्यू वैष्णव, गणेश जाधव, शिवकांत कदम, अर्जुन जाधव, दिनेश उपरे, दीपक मुळूक, नाथराव मुंडे सह शिवसैनिक सहभागी झाले होते.

Web Title: Shiv Sena aggressive on farmers' question

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.