शिवसेनेचे उमेदवार जयदत्तअण्णा असल्यामुळे विरोधकांना थारा नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2019 11:39 PM2019-10-11T23:39:09+5:302019-10-11T23:40:27+5:30
पालसिंगण परिसर शिवसेनेला साथ देणारा आहे. पुर्वीपासून जयदत्त आण्णा यांनादेखील येथून मदत झाली आहे. यावेळी शिवसेनेचे उमेदवार आण्णा स्वत: असल्यामुळे विरोधकांना मत मागण्यासाठी कुठेही थारा मिळणार नाही. राज्याच्या विधानसभेत बीडचा उमेदवार सर्वाधिक मताने निवडून येणार असे मत विलास महाराज शिंदे व्यक्त केले.
बीड : पालसिंगण परिसर शिवसेनेला साथ देणारा आहे. पुर्वीपासून जयदत्त आण्णा यांनादेखील येथून मदत झाली आहे. यावेळी शिवसेनेचे उमेदवार आण्णा स्वत: असल्यामुळे विरोधकांना मत मागण्यासाठी कुठेही थारा मिळणार नाही. राज्याच्या विधानसभेत बीडचा उमेदवार सर्वाधिक मताने निवडून येणार असे मत विलास महाराज शिंदे व्यक्त केले.
शिवसेना-भाजपा, रिपाई, रासप, रयत क्रांती महायुतीचे उमेदवार जयदत्त क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ पालसिंगण, सफेपूर, चांदेगाव, जेबापिंप्री येथे झालेल्या कॉर्नर बैठकीत ते बोलत होते.
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे, शिवसेना जिल्हाध्यक्ष कुंडलिक खांडे, अरूण डाके, अनिल जगताप, बाळासाहेब पिंगळे, दिनकर कदम, नितीन धांडे, सुशिल पिंगळे, सागर बहीर, झुंजार धांडे, भारत जगताप आदी उपस्थित होते.
विलास महाराज म्हणाले की, शांत, संयमी आणि माणूस जपणारे नेतृत्व म्हणून आण्णांकडे पाहिले जाते. आपण शिवसैनिकांनी जागरूकपणे आणि खंबीरपणे आण्णांच्या मागे उभे राहून एक नंबरचे मतदान धनुष्यबाणावर करावे, असे आवाहन त्यांनी केले.
कुंडलीक खांडे म्हणाले की, एक पुतण्या गेला म्हणून काय झाले हजारो पुतणे आण्णांच्या बरोबर आहेत. आण्णा नावातच एक मोठा पक्ष आहे. या परिसरात एकही गाव असे नाही की जिथे आण्णांनी काम केले नाही. आण्णा पुन्हा मंत्री होणार आहेत त्यामुळे आपल्या भागाच्या विकासाला गती येईल. त्यामुळेच येणाऱ्या युती सरकारमध्ये अण्णांना भरघोस मतांनी निवडून पाठवा.
भाजपा जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे म्हणाले, राज्याच्या राजकारणात अण्णा ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्यावर चांगल्या मंत्रीपदाची जबाबदारी येणार आहे. भाजपासह मित्रपक्ष आण्णांच्या सोबत आहेत. ही निवडणूक म्हणजे पोरखेळ नाही. त्यामुळे आपले अमुल्य मत धनुष्यबाण या चिन्हावर देऊन बीडचे नाव राज्यात पोहोचवा, असे आवाहन त्यांनी केले.
जयदत्त क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ आदि गावातील बहूसंख्य नागरिक, युवक, महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
गल्ली ते दिल्ली सरकार असेल तर जनतेला फायदा
यावेळी जयदत्त क्षीरसागर म्हणाले, धर्मवीर असे ज्यांना संबोधतात ते विलास महाराज आपल्यासोबत आहेत तसेच काकूंच्या काळापासून माझ्या पाठीशीही हा परिसर उभा राहिला आहे. हा योग जुळून आला आहे. दिल्ली ते गल्लीपर्यंत एकच सरकार असेल तर त्याचा फायदा होतो. नवा इतिहास घडविण्याची ही संधी आहे मी शेवटपर्यंत जनतेच्या प्रश्नासाठी काम करणार आहे. जनतेचे प्रेम हाच आपला श्वास आहे. त्यामुळे जनता एकमताने धनुष्यबाण पाहून मतदान करेल असा विश्वास वाटतो, असेही क्षीरसागर म्हणाले.