शिवसेना जिल्हा प्रमुख सचिन मुळूक पोलिसांच्या नजरकैदेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2019 12:24 AM2019-02-07T00:24:43+5:302019-02-07T00:25:28+5:30

नगर पालिकेने उभारलेल्या मल्टीपर्पज मैदानाला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव दिलेले आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकृत घोषणा करावी, अन्यथा आंदोलनाचा इशारा शिवसेना जिल्हा प्रमुख सचिन मुळूक यांनी दिला होता.

Shiv Sena district chief Sachin Mulk is in the custody of the police | शिवसेना जिल्हा प्रमुख सचिन मुळूक पोलिसांच्या नजरकैदेत

शिवसेना जिल्हा प्रमुख सचिन मुळूक पोलिसांच्या नजरकैदेत

googlenewsNext
ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांनी क्षीरसागरांचे ऐकून नागरिकांची मने दुखावली - सचिन मुळूक

बीड : नगर पालिकेने उभारलेल्या मल्टीपर्पज मैदानाला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव दिलेले आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकृत घोषणा करावी, अन्यथा आंदोलनाचा इशारा शिवसेना जिल्हा प्रमुख सचिन मुळूक यांनी दिला होता. त्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले आणि बुधवारी सकाळपासूनच त्यांना नजरकैदेत ठेवले. तर मुख्यमंत्र्यांनी क्षीरसागरांचे ऐकून मैदानाच्या नावाबद्दल घोषणा केली नसल्याचा आरोप मुळूक यांनी केला आहे.
मागील काही दिवसांपासून क्रीडांगणाच्या नावावरून वाद सुरू झाले आहेत. क्रीडांगणाच्या कमानीवर छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण असे नावही टाकले होते. हे नाव काढण्यासाठी प्रशासन गेले असता चार दिवसांपूर्वी याबाबत काही संघंटना, पक्षांनी एकत्र येत आंदोलन केले होते. त्यानंतर प्रशासन माघारी परतले.
बुधवारी मुख्यमंत्री येणार असल्याने शिवसेना जिल्हा प्रमुख सचिन मुळूक यांनी याबाबत अधिकृत घोषणा करण्याची मागणी केली होती. त्यांनी तसे पत्रकही काढले होते. मात्र त्यांना प्रशासनाने नजरकैदेत ठेवले. सभा संपेपर्यंत त्यांच्यावर ही नजर कायम होती.
दरम्यान, शिवसेनेचे सुशिल पिंगळे, संजय महाद्वारसह अनेक कार्यकर्ते नगर पालिकेत मुख्यमंत्री असताना तेथे गेले आणि नावाची घोषणा करा, अशी विनंती करणारे निवेदन दिले. मात्र, मुख्यमंत्र्यांनी सभा संपेपर्यंत याबाबत काहीच घोषणा केली नाही.

Web Title: Shiv Sena district chief Sachin Mulk is in the custody of the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.