शिवसेना शिंदे गटाच्या बीड कार्यकारणीत कोणाची वर्णी लागणार? सायंकाळपर्यंत होणार जाहीर
By सोमनाथ खताळ | Published: August 26, 2022 04:48 PM2022-08-26T16:48:53+5:302022-08-26T16:49:34+5:30
आज सायंकाळपर्यंत नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहिर होण्याची शक्यता आहे.
बीड : जिल्ह्यात शिवसेना (शिंदे गट) आणखी बळकट करण्यासाठी जिल्हाप्रमुख कामाला लागले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या पासून नाराज झालेले सचिन मुळूक व कुंडलिक खांडे यांच्यावर जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी दिली. हे दोघेही दोन दिवसांपासून मुंबईत तळ ठोकून होते. ठाकरे गटातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांना आपल्या गटात आणले. आता त्यांच्यासह काही नवीन चेहऱ्यांना संधी देत पदाधिकारी बनविले जाणार आहे.
आज सायंकाळपर्यंत नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहिर होण्याची शक्यता आहे. तर दुसऱ्या बाजुला ठाकरे गटाचे संपर्क प्रमुख धाेंडू पाटील जिल्ह्याचा दौरा करत आहेत. पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या बैठकाही घेत आहेत. असे असले तरी येणाऱ्या काळात बंडखोरी रोखण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे. कारण आजही काही आजी पदाधिकारी शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. दरम्यान, शिंदे गटाच्या नव्या पदाधिकाऱ्यांमध्ये कोणाची वर्णी लागणार? याकडे लक्ष लागले आहे.