शिवसेना स्वबळावर विधानसभेवर भगवा फडकवणार : रामदास कदम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2018 12:15 AM2018-02-08T00:15:26+5:302018-02-08T00:15:33+5:30
शिवसेना स्वबळावर विधानसभेवर भगवा फडकवणार असून बीड जिल्ह्यातील सर्व विधानसभेच्या जागा जिंकेल, असे शिवसेना नेते पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी बुधवारी बीड जिल्हा संपर्क दौºयात जिल्हाभरातील शिवसैनिकांशी संवाद साधत सांगितले. राजकारणातील मात्तबरांच्या प्रवेशासमयी बोलताना भाजपाच्या शेतकरीविरोधी धोरणाचा खरपूस समाचार घेतला.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : शिवसेना स्वबळावर विधानसभेवर भगवा फडकवणार असून बीड जिल्ह्यातील सर्व विधानसभेच्या जागा जिंकेल, असे शिवसेना नेते पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी बुधवारी बीड जिल्हा संपर्क दौºयात जिल्हाभरातील शिवसैनिकांशी संवाद साधत सांगितले. राजकारणातील मात्तबरांच्या प्रवेशासमयी बोलताना भाजपाच्या शेतकरीविरोधी धोरणाचा खरपूस समाचार घेतला.
नवनियुक्त दोन्ही जिल्हाप्रमुख चांगले काम करत आहेत. प्रवेशाची गर्दीच त्यांचे काम दाखवत आहे. बीड जिल्ह्यात काही जणांनी शिवसेनेची साथ घेतली व स्वत:चीच पोटे भरून शिवसेना मोठी होऊ न दिल्याचा टोलाही रामदास कदम यांनी लगावला. भाजपाने या जिल्ह्यात शिवसेना वाढू दिली नाही. आता शिवसेना गावपातळीवर जाऊन घराघरात पोहोचणार असल्याचे त्यांनी सांगितले. तत्पूर्वी शासकीय विश्रामगृहावर सर्व पदाधिकाºयांची बैठक झाली होती. यामध्ये शिवसेनेच्या आगामी धोरणाबाबत तसेच पक्षवाढीसंदर्भात शिवसेना पदाधिकारी व लोकप्रतिनिधींशी कदम यांची चर्चा झाली.
यावेळी रामदास भाई कदम यांच्यासह संपर्क प्रमुख सुधीर मोरे, महिला आघाडी संपर्क प्रमुख संपदा गडकरी, गोविंद घोळवे, जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे, सचिन मुळुक, विलास महाराज शिंदे, बदामराव पंडित, सुनील धांडें, चंद्रकांत नवले, बाळासाहेब पिंगळे, युद्धजीत पंडित, नारायण काशीद, संजय महाद्वार, बाळासाहेब अंबुरे, भारत जगताप, शहरप्रमुख सुदर्शन धांडें, बप्पासाहेब घुगे, उल्हास गिराम, जालिंदर वांढरे, अजय दाभाडे, भरत जाधव, राहुल चौरे, नितीन धांडें, नवनाथ प्रभाळे, बाळासाहेब जटाळ, मशरू पठाण, जिल्हाअधिकारी युवासेना सुशील पिंगळे, यासह शिवसैनिक उपस्थित होते.