धारूरमध्ये गोळी झाडून घेत शिवसेनेच्या कार्यकर्त्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2018 06:43 PM2018-10-04T18:43:20+5:302018-10-04T18:45:04+5:30
शिवसेनेत कार्यरत असलेले बाबासाहेब शिवाजीराव घोडके (४३) यांनी आपल्याजवळील गावठी पिस्तूलने छातीत गोळी झाडून घेत आत्महत्या केली.
धारूर (बीड ) : विद्यार्थी दशेपासून शिवसेनेत कार्यरत असलेले बाबासाहेब शिवाजीराव घोडके (४३) यांनी आपल्याजवळील गावठी पिस्तूलने छातीत गोळी झाडून घेत आत्महत्या केली. ही घटना आज पहाटेच्या सुमारास उघडकीस आली. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
बाबासाहेब घोडके यांनी विद्यार्थी सेनेचे शहर प्रमुख म्हणुन दशकभर कार्य केले होते. यानतंर गेल्या दोन वषार्पुर्वी जमीनीवर नेटशेड उभारणी करुन जरबेरा फुलशेती व्यवसाय सुरु केला होता. सामाजीक कार्यातही त्यांचे योगदान मोठे होते. मागील काही दिवसांपासून ते ताणवाखाली असल्याचे जाणवत होते. त्यातूनच त्यांनी गावठी पिस्तुलद्वारे छातीवर गोळी झाडुन आत्महत्या केली. यावेळी कुटुंबातील कोणीही त्यांच्या जवळ नव्हते.
आज सकाळी ही घटना लक्षात आली. त्यानंतर धारूर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी धाव घेत पंचनामा केला आहे. धारूर ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंदही झाली आहे. त्यांचे पश्चात वडील, पत्नी, दोन भाऊ, दोन मुले असा परीवार आहे. घोडके यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट नसले तरी या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.