शिवाजी महाराजांनी सर्वधर्मसमभाव दृष्टिकोन जोपासला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 05:36 AM2021-02-20T05:36:13+5:302021-02-20T05:36:13+5:30

परळी शहरातील शिवाजी चौकात शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर ते बोलत होते. महाराजांनी आपल्या स्वराज्यात प्रत्येक जाती-धर्माच्या लोकांना ...

Shivaji Maharaj took a multi-religious approach | शिवाजी महाराजांनी सर्वधर्मसमभाव दृष्टिकोन जोपासला

शिवाजी महाराजांनी सर्वधर्मसमभाव दृष्टिकोन जोपासला

Next

परळी शहरातील शिवाजी चौकात शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर ते बोलत होते. महाराजांनी आपल्या स्वराज्यात प्रत्येक जाती-धर्माच्या लोकांना सन्मानपूर्वक आणि आदराची वागणूक दिली. त्यांच्या धर्माचे रक्षण करण्याचे काम केले. प्रत्येक धर्म माणुसकी शिकवतो. मानवता हाच प्रत्येक धर्माचा पाया आहे, या विचारातून त्यांनी राज्य केले. प्रत्येक धर्म हा समानतेची शिकवण देतो म्हणून प्रत्येकानेच इतर धर्मांना तुच्छ लेखू नये, तर त्यांच्याप्रती समभाव दृष्टिकोन जोपासावा, असेही ॲड. संकाये यांनी सांगितले. या कार्यक्रमाला मुंजाभाऊ साठे, विवेक दांडगे, मुंजाभाऊ गरड, दीपक शेटे, अनिल चौधरी, सोमनाथ दौंड, मुन्ना चव्हाण, बालासाहेब गुट्टे, ज्ञानदेव आंबुरे, राम चाटे, विलास गीते, वाघा रोडे, सुंदर आव्हाड, नाना अचारे, कैलास साठे, शिवा बडे, संतोष कांबळे, संजय पाटील, दगडू भाळे, सोहेल तहीत आदींसह युवा कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Shivaji Maharaj took a multi-religious approach

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.