शिवभोजन थाळी ठरतेय निराधार व गरजूंना आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:33 AM2021-03-31T04:33:47+5:302021-03-31T04:33:47+5:30
धारूर : कोरोना प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने लागू केलेल्या लाॕॅकडाऊनमध्ये गरजू व रस्त्याने जाणाऱ्या फिरस्तींना राज्यातील महाविकास आघाडी ...
धारूर : कोरोना प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने लागू केलेल्या लाॕॅकडाऊनमध्ये गरजू व रस्त्याने जाणाऱ्या फिरस्तींना राज्यातील महाविकास आघाडी शासनाने सुरू केलेले शिवभोजन उपयोगी ठरले. धारूर येथील शिवभोजन केंद्रावर असे गरजू लाभार्थी लाभ घेताना दिसत आहेत.
धारूर येथील बसस्थानकासमोर महाअघाडी शासनाने सुरू केलेले शिवभोजन केंद्र आहे. हे शिवभोजन केंद्र गतवर्षीच्या लाॉकडाऊनमध्ये गरजू निराधारांना आधार ठरले होते. याही वर्षी लाॕॅकडाऊनमध्ये पुन्हा हे केंद्र आधार ठरले आहे. गरजू व रस्त्याने फिरणाऱ्यांना लाॕकडाऊन काळात कडेकोट बंद असताना हे शिवभोजन केंद्र पोटाला आधार देणारे महत्वाच केंद्र ठरत आहेत. सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजेपर्यंत हे शिवभोजन केंद्र सुरू असते. शिवभोजनचे चालक राधेश्याम रहेवाल म्हणाले की, गतवर्षी लाॕॅकडाऊन काळात रस्त्याने जाणाऱ्या अनेक गरजँना शिवभोजनच्या माध्यमातून जेवणाची सुविधा देता आली. या लाॉकडाऊन काळातही आम्ही गरजूंना सेवा देण्याचा प्रयत्न करत आहोत.
===Photopath===
280321\4301img_20210328_101622_14.jpg