शिवसेना, राष्टवादी कॉँग्रेसने मिळवली ‘हॅटट्रिक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2019 12:24 AM2019-07-01T00:24:53+5:302019-07-01T00:25:32+5:30

विधानसभा निवडणुकांना काही महिने अवकाश असला तरी बीड विधानसभा मतदार संघात मात्र राजकीय वातावरण तापण्यास सुरूवात झाली आहे.

Shivsena, Nationalist Congress gain hat-trick | शिवसेना, राष्टवादी कॉँग्रेसने मिळवली ‘हॅटट्रिक’

शिवसेना, राष्टवादी कॉँग्रेसने मिळवली ‘हॅटट्रिक’

Next
ठळक मुद्देबीड विधानसभा मतदार संघ : नऊ निवडणुकांत कॉँग्रेस, कॉँग्रेस एस, जनता पक्षाला मिळाला एकदा विजय

सतीश जोशी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : विधानसभा निवडणुकांना काही महिने अवकाश असला तरी बीड विधानसभा मतदार संघात मात्र राजकीय वातावरण तापण्यास सुरूवात झाली आहे. १९७८ पासून आतापर्यंत नऊ निवडणुका झाल्या. पैकी राष्टÑवादी काँग्रेस आणि शिवसेनेने तीन वेळा तर काँग्रेस, काँग्रेस (अर्स) आणि जनता पक्षाने प्रत्येकी एक वेळेस या मतदार संघात विजय संपादन केला आहे.
बीड विधानसभा मतदार संघात एकूण ३ लाख ३० हजार ६१९ मतदार असून यापैकी १ लाख ७६ हजार ७१४ पुरुष, १ लाख ५३ हजार ९०० महिला तर ५ मतदार तृतीयपंथी आहेत. जवळपास सर्वच पक्षांना या मतदार संघाने विजयश्री देऊन नेतृत्त्व करण्याची संधी दिली आहे. राष्टÑवादी काँग्रेसचे जयदत्त क्षीरसागर आणि शिवसेनेचे प्रा. सुरेश नवले हे लागोपाठ दुसऱ्यांदा विजयी झाले. परंतु, १९९० मध्ये नवले यांनी अपक्ष उमेदवार माजी आ. राजेंद्र जगताप यांचा १४ हजार मतांनी तर १९९५ मध्ये त्यांनी जयदत्त क्षीरसागर यांचा २६ हजार ६९१ मतांनी पराभव केला होता. तिसऱ्यांदा म्हणजे १९९९ मध्ये ते अपक्ष म्हणून रिंगणात उतरले परंतु पराभूत झाले. जयदत्त क्षीरसागर यांनी २००९ मध्ये शिवसेनेचे सुनिल धांडे यांचा जवळपास ७५ हजार मतांनी तर २०१४ मध्ये जिल्ह्यात नरेंद्र मोदी लाट असतानाही भाजपाच्या तिकिटावर उभे टाकलेल्या शिवसंग्रामचे विनायक मेटे यांचा जवळपास सहा हजार मतांनी पराभव केला. आता ते शिवसेनेत येऊन मंत्री झाले आहेत.
सर्वच पक्षांना आघाडी, युतीच्या माध्यमातून या मतदारसंघाने निवडून दिले परंतु, अपेक्षेप्रमाणे विकास झाला नाही. एकेकाळी येथील तेल उद्योग प्रगती पथावर होता, मोठी आर्थिक उलाढाल होत असे, थोड्याफार प्रमाणात रोजगार निर्माण होत असे परंतु, तो आता डबघाईला आला आहे. आजही बीड शहर प्राथमिक नागरी सुविधातच अडकले आहे. केवळ नगर पालिकेची यंत्रणा कुचकामी असल्यामुळे शहरवासियांना १५-१५ दिवस पाणी मिळत नाही. अमृत पेयजल योजनेचे अधिक गतीने पूर्ण होणे गरजेचे आहे. भूमीगत गटार योजना मंजूर झाली परंतु ती सुरू कधी होणार हा एक प्रश्न आहे. पाणी पुरवठा योजनेच्या कामामुळे शहरातील रस्ते फोडले आहेत. याचवेळी जर गटार योजनेचे काम हाती घेतले तर पुन्हा पुन्हा रस्त्याची फोडाफोडी होणार नाही.सामान्य रुग्णालयाच्या वाढीव खाटाच्या प्रस्तावास मंजुरी मिळाली आहे. हे कामदेखील लवकर पूर्ण झाले तर त्याचा रुग्णांना फायदा होईल. बीड बायपासमुळे अनेक गावांचा दळणवळणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. औद्योगिक विकास रखडला आहे. रेल्वेमार्गाचे काम पूर्ण न झाल्यामुळे नवीन प्रकल्प येणार नाहीत. हा प्रकल्प पूर्ण होणे गरजेचा आहे.

Web Title: Shivsena, Nationalist Congress gain hat-trick

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.