धक्कादायक; बीड जिल्ह्यात लपवले १०५ कोरोना बळी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2021 04:22 AM2021-05-09T04:22:18+5:302021-05-09T04:23:04+5:30

कोरोनामुळे मृत्यूंची वाढली आहे. या सर्व मृत्यूंची नोंद तत्काळ आयसीएमआरच्या पोर्टलवर होणे अपेक्षित असते.  पण ती होत नसल्याचे दिसते.  खोलवर जाऊन माहिती घेतली असता, अनेक धक्कादायक प्रकार समोर आले.

Shocking; 105 corona victims hid in Beed district | धक्कादायक; बीड जिल्ह्यात लपवले १०५ कोरोना बळी

धक्कादायक; बीड जिल्ह्यात लपवले १०५ कोरोना बळी

Next

सोमनाथ खताळ - 

बीड
: जिल्ह्यात काेरोनाच्या वाढत्या रुग्णांसह मृत्यूही होत आहेत. ते रोखण्यात आरोग्य विभाग व प्रशासनाला अपयश येत आहे. हे अपयश झाकण्यासाठी आरोग्य विभाग चक्क मृत्यूचा आकडा लपवत असल्याचे उघड झाले आहे. बीड व अंबाजोगाईत केवळ एप्रिल महिन्यात तब्बल ३७८ बाधितांवर अंत्यसंस्कार झाल्याची नोंद आहे. तर, आरोग्य विभागात याच महिन्यात २७३ मृत्यूंची नोंद आहे. यावरून १०५ कोरोना बळींचा आकडा दडविल्याचे सिद्ध होत आहे. (Shocking; 105 corona victims hid in Beed district)

कोरोनामुळे मृत्यूंची वाढली आहे. या सर्व मृत्यूंची नोंद तत्काळ आयसीएमआरच्या पोर्टलवर होणे अपेक्षित असते.  पण ती होत नसल्याचे दिसते.  खोलवर जाऊन माहिती घेतली असता, अनेक धक्कादायक प्रकार समोर आले.

एप्रिल महिन्यात बीडमधील भगवानबाबा स्मशानभूमीत ११४ तर अंबाजोगाईतील स्मशानभूमीत २६४ बाधितांवर अंत्यसंस्कार झाल्याची नोंद नगरपालिकेत आहे. तर, दुसऱ्या बाजूला याच महिन्यात आरोग्य विभागाकडे २७३ मृत्यूंची नोंद झालेली आहे. त्यामुळे १०५ मृत्यू लपविल्याचे उघड होत आहे.
 

Web Title: Shocking; 105 corona victims hid in Beed district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.