धक्कादायक ! जंतनाशक गोळी दिल्यानंतर चिमुरडीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:33 AM2021-03-10T04:33:07+5:302021-03-10T04:33:07+5:30

कडा : जंतनाशक गोळी दिल्यानंतर प्रांजल अंकुश रक्ताटे नामक चिमुरडीचा अकस्मात मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला आहे. प्रांजलचे वय ...

Shocking! Chimurdi dies after being dewormed | धक्कादायक ! जंतनाशक गोळी दिल्यानंतर चिमुरडीचा मृत्यू

धक्कादायक ! जंतनाशक गोळी दिल्यानंतर चिमुरडीचा मृत्यू

Next

कडा : जंतनाशक गोळी दिल्यानंतर प्रांजल अंकुश रक्ताटे नामक चिमुरडीचा अकस्मात मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला आहे. प्रांजलचे वय अवघे २२ महिने इतके आहे. आष्टी तालुक्यातील लोणी सय्यदमीर या गावात सोमवारी ही घटना घडली. या चिमुरडीची उत्तरीय तपासणी अहमदनगर जिल्हा रुग्णालयात करण्यात आली आहे. अहवाल आल्यानंतर मृत्यूचे कारण अधिक स्पष्ट होईल.

प्रांजलचे काका भाऊसाहेब रक्ताटे यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, ‘लोणी सय्यदमीर या गावात जिल्हा आरोग्य यंत्रणेचे उपकेंद्र आहे. ते बंद असल्याने जंतनाशक गोळ्या गावातील मारूती मंदिरात आशा सेविकांच्या माध्यमातून वाटण्यात आल्या. मुलांच्या पालकांच्या हाती गोळ्या देऊन घरी गेल्यावर मुलांना द्या, असे सांगण्यात आले. परंतु या गोळ्या कशा घ्यायच्या हे सांगण्यात आले नाही. गोळ्या घरी घेऊन आल्यावर प्रांजल हिला पूर्ण गोळीतील अर्धी गोळी दिली. तिला गोळी दिल्यानंतर ती जमिनीवर कोसळली. तिने अंग सोडून दिले. त्यानंतर तिला गावातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून नगर येथील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. परंतु तिथे उपचारापूर्वी तिचा मृत्यू झाला. गोळीमधील उर्वरित गोळी तशीच आहे.’

याबाबत आष्टी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नितीन मोरे म्हणाले, ‘जंतनाशक गोळ्या वितरणाची मोहीम एक मार्चपासून सुरू आहे. गावात अशाप्रकारे कोणालाही त्रास झालेला नाही. गावात राहिलेल्या मुलांसाठी गोळ्यांचे वितरण केले. जंतनाशक गोळ्यांनी मृत्यू होत नाही. शवविच्छेदन अहवाल प्राप्त होताच कारण स्पष्ट होईल असे त्यांनी लोकमतला सांगितले.

===Photopath===

090321\nitin kmble_img-20210309-wa0036_14.jpg

===Caption===

प्रांजल रक्ताटे

Web Title: Shocking! Chimurdi dies after being dewormed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.