धक्कादायक; अगोदर अवहेलना आता मृतदेहाला लागल्या मुंग्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:33 AM2021-05-23T04:33:55+5:302021-05-23T04:33:55+5:30

बीड : चार दिवसांपूर्वीच कोरोनाबाधित असल्याचे कारण पुढे करत महिलेच्या मृतदेहाची अवहेलना केल्याचा प्रकार ताजा असतानाच आता शवगृहातील मृतदेहाला ...

Shocking; The earlier contempt now ants the corpse | धक्कादायक; अगोदर अवहेलना आता मृतदेहाला लागल्या मुंग्या

धक्कादायक; अगोदर अवहेलना आता मृतदेहाला लागल्या मुंग्या

Next

बीड : चार दिवसांपूर्वीच कोरोनाबाधित असल्याचे कारण पुढे करत महिलेच्या मृतदेहाची अवहेलना केल्याचा प्रकार ताजा असतानाच आता शवगृहातील मृतदेहाला मुंग्या लागल्याचे शनिवारी उघड झाले आहे. जिल्हा रुग्णालयात मृतदेहांची कायम हेळसांड होत असल्याचे यानिमित्ताने पुन्हा एकदा समोर आले असून सर्वत्र खळबळ उडाली आहे.

मागील काही दिवसांपासून जिल्हा रुग्णालयात सुविधा आणि उपचाराबद्दल तक्रारी वाढत असतानाच आता मृतदेहांची हेळसांड होत असल्याचे उघड होत आहे. १९ मे रोजी गेवराई तालुक्यातील पाडळसिंगी येथील ५० वर्षीय अनोळखी इसम जखमी अवस्थेत जिल्हा रुग्णालयात दाखल झाला होता. दोन दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर शनिवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर मृतदेह शवगृहात ठेवण्यात आला; परंतु येथे कसलीच व्यवस्था नसल्याने आणि सर्वत्र अस्वच्छता असल्याने मृतदेहाला चक्क मुंग्या लागल्याचे उघड झाले. हा प्रकार समोर येताच राज्यभरात खळबळ उडाली. असे असले तरी बीड जिल्हा रुग्णालय प्रशासन मात्र नेहमीप्रमाणे सुस्तच होते. यापूर्वी देखील असे प्रकार अनेकदा घडल्यानंतरही यावर कसल्याच उपाययोजना केल्या नसल्याचे या घटनेवरून उघड होत आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांमधून आरोग्य विभागाबद्दल तीव्र रोष व्यक्त होत आहे. आता यात दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. याबाबत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सूर्यकांत गित्ते यांना संपर्क केला असता, त्यांनी कॉल परत करतो, असा संदेश पाठविला. रात्री ९ वाजेपर्यंत त्यांचा कॉल आला नव्हता. त्यामुळे त्यांची बाजू समजली नाही.

Web Title: Shocking; The earlier contempt now ants the corpse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.