धक्कादायक ! 'रापम'च्या विभागीय कार्यालयातच महिला कर्मचाऱ्याला अधिकाऱ्याकडून मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:30 PM2021-08-19T16:30:50+5:302021-08-19T16:35:10+5:30

अविवाहित महिला कर्मचारी काम करत असताना तिला प्रभारी लेखापाल नारायण मुंडे यांनी वाईट हेतून स्पर्श केला.

Shocking! A female employee was beaten by an officer in the 'ST's divisional office Beed | धक्कादायक ! 'रापम'च्या विभागीय कार्यालयातच महिला कर्मचाऱ्याला अधिकाऱ्याकडून मारहाण

धक्कादायक ! 'रापम'च्या विभागीय कार्यालयातच महिला कर्मचाऱ्याला अधिकाऱ्याकडून मारहाण

Next
ठळक मुद्देमहिलेची विभागीय नियंत्रकांकडे तक्रारपिडीतेची छेडछाड केल्याचाही आरोप

बीड : येथील राज्य परिवहन महामंडळाच्या विभागीय कार्यालयातील एका महिला कर्मचाऱ्याला अधिकाऱ्याने छेडछाड करीत कार्यालयातच मारहाण केल्याची घटना १४ ऑगस्ट रोजी घडली होती. घाबरलेल्या महिलेने बुधवारी याबाबत विभागीय नियंत्रकांकडे लेखी तक्रार केली आहे. या प्रकाराने एसटी महामंडळात खळबळ उडाली आहे. तर दुसऱ्या बाजूला महिलेच्या आरोपात तथ्य नसल्याचा दावा अधिकाऱ्याने केला आहे.

विभागीय कार्यालयात महिला कर्मचाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. यापूर्वीही साधारण दोन वर्षांपूर्वी एका अधिकाऱ्याने आपल्याच विभागातील महिला कर्मचाऱ्याची छेडछाड करत शरीर सुखाची मागणी केली होती. याची तक्रार केल्यानंतर दक्षता समितीने चौकशी केली. यात दोषी आढळल्याने संबंधित अधिकाऱ्यावर विनयभंगाचा गुन्हाही दाखल झाला होता. ही घटना विसरण्यापूर्वीच आता लेखा विभागात नवीन घटना घडली आहे. अविवाहित महिला कर्मचारी काम करत असताना तिला प्रभारी लेखापाल नारायण मुंडे यांनी वाईट हेतून स्पर्श केला. यावर ती रागावून वरिष्ठांकडे तक्रार देण्यास जाताना तिला पायऱ्यांवर अडवून मुंडे यांनी मारहाण केली. तसेच नौकरी घालविण्याची धमकी दिल्याचा उल्लेख तक्रारीत आहे. या प्रकाराने मात्र, बीड रापम कार्यालय पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

हेही वाचा - स्वप्नीलचे रुग्णसेवेचे स्वप्न अधुरे; नाशिकमध्ये संशयास्पद मृत्यूने कुटुंबाला जबर धक्का

डीसी म्हणतात, आणखी त्रास सहन कर - पीडिता
५ ऑगस्ट रोजीही धमकावल्याचा प्रकार घडला होता. पीडित महिला कर्मचारी विभागीय नियंत्रक अजय मोरे यांच्याकडे तक्रार घेऊन गेली. यावर तिला डेपोत बदली करतो, नाहीतर आणखी त्रास सहन कर, असे उत्तर दिल्याचे पीडिता सांगते. या प्रकारावरून मोरे यांच्याकडूनही अधिकाऱ्याला अभय असल्याचा आरोप केला जात आहे.

सर्व आरोप खोटे 
माझ्या विभागात १० ते १२ महिला कर्मचारी आहेत. सर्वांना आई-बहिणीप्रमाणे सन्मान देतो. माझ्यावर केलेले आरोप सर्व खोटे असून त्यात काहीही तथ्य नाही. केवळ बदली पाहिजे म्हणून हे करण्यात आले आहे. याने माझीच मानसिकता खचली आहे.
- नारायण मुंडे, लेखापाल रापम बीड

चौकशी केली जाईल
माझ्याकडे तक्रार आली आहे. बुधवारी रात्री उशिरा तक्रार आली असून गुरूवारी सुट्टी आहे. शुक्रवारी दोघांनाही समोर बोलवून चौकशी केली जाईल.
- अजय मोरे, विभागीय नियंत्रक, बीड

Web Title: Shocking! A female employee was beaten by an officer in the 'ST's divisional office Beed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.