धक्कादायक ! ५० हजारांसाठी ३ वर्षांच्या चिमुकल्यासह मजूर महिलेस डांबले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2021 07:19 PM2021-10-05T19:19:00+5:302021-10-05T19:25:48+5:30
crime in Beed : ऊसतोडीच्या ५० हजार उचलसाठी मुकादमाची दमदाटी
दिंद्रुड (जि. बीड) : ऊसतोडीच्या ५० हजार रुपयांसाठी राजेवाडी (ता.माजलगाव) येथील मजूर महिलेचे तीन वर्षांच्या चिमुकल्यासह अपहरण ( Kidnapping ) केले. परभणी जिल्ह्यात डांबून तिचा विनयभंग केला. त्यानंतर, रिक्षातून तिला परत पाठवून दिले. हा धक्कादायक प्रकार ३ ऑक्टोबर रोजी समोर आला. या प्रकरणी दिंद्रुड ठाण्यात चौघांवर गुन्हा नोंद झाला. ऊसतोड मुकादम लक्ष्मण गोविंद गायकवाड, सचिन त्रिमुख जाधव, देविदास गोविंद गायकवाड व संजूबाई लक्ष्मण गायकवाड (सर्व रा.गंगाखेड, जि.परभणी) अशी आरोपींची नावे आहेत. ( Shocking! For Rs 50 thousand women kidnapped along with 3 yr child )
राजेवाडी येथील पीडित २५ वर्षीय महिलेच्या तक्रारीनुसार, ती पतीसोबत ऊसतोडीचे काम करते. तिला दोन मुले व एक मुलगी आहे. गतवर्षी नात्यातीलच मुकादम लक्ष्मण गायकवाड याच्याकडून उचल घेऊन पीडित महिला पतीसह कर्नाटकात ऊसतोडीसाठी गेली होती. ५० हजार रुपये पीडितेकडे शिल्लक होते. ५० हजार रुपयांसाठी मुकादमाचा तगादा सुरू होता. १ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता पीडितेचे पती बाहेरगावी होते. यावेळी लक्ष्मण गायकवाड हा इतर तिघांसमवेत घरी आला. त्याने पीडिता तिचा तीन वर्षांचा मुलगा या मायलेकरांना बळजबरीने जीपमध्ये (एमएच ४६ बी-३११८) बसविले. तिला थेट गंगाखेड येथे नेऊन एका खोलीत डांबले. यावेळी पीडितेला लाथाबुक्क्याने मारहाण करून, लक्ष्मण गायकवाड याने विनयभंग केला. त्यानंतर, रात्री नऊ वाजता पिंपरी (ता.गंगाखेड) येथे एका पत्र्याच्या खोलीत डांबून ठेऊन पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. दोन दिवस तेथेच डांबल्यानंतर ३ रोजी सकाळी ११ वाजता एका रिक्षातून दिंद्रुड येथे पाठविले.
संतापजनक ! मूकबधिर विवाहितेवर नराधमाने घरात घुसून केला अत्याचार
चारही आरोपी फरार
दरम्यान, पीडितेने दिंद्रुड ठाणे गाठून तक्रार दिली. त्यावरून गुन्हा नोंद झाला. सर्व आरोपी फरार असून, तपास सुरू असल्याचे सहायक निरीक्षक प्रभा पुंडगे यांनी सांगितले.
शेतीत तोटा झाल्याने देशी जुगाड केला, शुद्ध हळद डोळ्यांसमोर दळून देत पैसा कमावला