धक्कादायक : एकाच रुग्णवाहिकेतून २२ मृतदेहांची वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:34 AM2021-04-27T04:34:07+5:302021-04-27T04:34:07+5:30

अंबाजोगाई : येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात कोरोनामुळे मृत झालेल्या तब्बल २२ रुग्णांचे मृतदेह एकाच रुग्णवाहिकेतून स्मशानभूमीकडे नेण्यात आल्याची ...

Shocking: Transport of 22 bodies in a single ambulance | धक्कादायक : एकाच रुग्णवाहिकेतून २२ मृतदेहांची वाहतूक

धक्कादायक : एकाच रुग्णवाहिकेतून २२ मृतदेहांची वाहतूक

Next

अंबाजोगाई : येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात कोरोनामुळे मृत झालेल्या तब्बल २२ रुग्णांचे मृतदेह एकाच रुग्णवाहिकेतून स्मशानभूमीकडे नेण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या प्रकारामुळे मरण पावल्यानंतरही कोरोनाबाधितांची अवहेलना पाहून अनेकांची मने हेलावली.

बीड जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. हजारो नागरिक नव्याने बाधित होत आहेत. विशेषतः अंबाजोगाई तालुक्यातील परिस्थिती गंभीर आहे. वाढत्या रुग्णसंख्येसोबतच मृतांचेही प्रमाण वाढले आहे. रविवारी दुपारी चक्क २२ रुग्णांचे मृतदेह एकाच रुग्णवाहिकेतून स्मशानभूमीकडे नेण्यात आले. यावेळी रुग्णवाहिकेत अक्षरशः मृतदेह कोंबले होते. मयत झालेल्या रुग्णांना अशा पद्धतीने अंत्यविधीसाठी नेण्याचा प्रकार अत्यंत धक्कादायक असून प्रशासनाला माणसांची किंमत राहिलेली नाही का? असा सवाल केला जात आहे.

..

एकाच रुग्णवाहिकेतून रुग्ण आणि मृतदेहांची वाहतूक

जिल्हा प्रशासनाकडून स्वाराती रुग्णालयाला अधिग्रहित केलेल्या दोन रुग्णवाहिका दिल्या आहेत. रुग्णांच्या तुलनेत ही संख्या अत्यंत कमी आहे. त्यामुळे ज्या रुग्णवाहिकेतून मृतदेहांची वाहतूक केली जाते तीच रुग्णवाहिका नंतर रुग्णांची ने-आण करण्यासाठी वापरली जाते. रुग्णवाहिका निर्जंतुकीकरणासाठी सॅनिटायजरही देण्यात येत नसल्याची तक्रार आहे. त्यामुळे अशा प्रकारे कोरोनाचा प्रसार आणखी वाढण्याची दाट शक्यता आहे. प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे नागरिकांचा जीव मात्र धोक्यात येत आहे.

...

कोरोनाच्या पहिल्या लाटेत स्वारातीला पाच रुग्णवाहिका देण्यात आल्या होत्या, सध्या दोनच आहेत. वाढीव रुग्णवाहिकांसाठी आम्ही १७ मार्च रोजी जिल्हा प्रशासनाला पत्र दिले आहे; परंतु अद्याप रुग्णवाहिका मिळाल्या नाहीत. रुग्णवाहिकेच्या कमतरतेमुळे आपत्कालीन स्थितीत रुग्णांची ने-आण करण्यासाठी या रुग्णवाहिकांचा वापर झालेला असू शकतो. सॅनिटायजर देण्यात येत नसल्याची कोणत्याही रुग्णवाहिका चालकाची तक्रार अद्याप माझ्यापर्यंत नाही.

- डाॅ. शिवाजी सुक्रे, अधिष्ठाता, स्वाराती रुग्णालय. अंबाजोगाई.

...

यापुढे कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला की तातडीने अंत्यसंस्काराची कार्यवाही सुरू करण्यात येईल. दिवसभरातील मृतदेह जमा करून एकाच वेळी अंत्यसंस्कार करू नयेत, अशा सक्त सूचना देण्यात आल्या आहेत.

- शरद झाडके, उपविभागीय अधिकारी, अंबाजोगाई.

...

‘मानवलोक’कडून मदतीची तयारी

‘मानवलोक’ची रुग्णवाहिका कोणत्याही क्षणी उपलब्ध करून देण्याची आम्ही प्रशासनाला तयारी दाखविली आहे. लोखंडीच्या कोविड सेंटरमधून आमची रुग्णवाहिका नियमित मागवली जाते. स्वाराती रुग्णालयालाही ती देण्याची आमची तयारी आहे, असे

मानवलोकचे कार्यवाहक अनिकेत लोहिया यांंनी सांगितले.

...

Web Title: Shocking: Transport of 22 bodies in a single ambulance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.