धक्कादायक ! महसूल विभागाने पकडलेली दोनशे ब्रास वाळू गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2020 01:57 PM2020-11-13T13:57:32+5:302020-11-13T14:00:21+5:30

२०० ब्रास वाळू पंचासमक्ष सील करून ५४ लाख १९ हजार २० रूपये दंड लावण्यात आला होता

Shocking! Two hundred brass sands seized by the revenue department disappear | धक्कादायक ! महसूल विभागाने पकडलेली दोनशे ब्रास वाळू गायब

धक्कादायक ! महसूल विभागाने पकडलेली दोनशे ब्रास वाळू गायब

Next
ठळक मुद्देताबा पावती करून दिली होती पोलीस पाटल्याच्या ताब्यात

कडा (जि. बीड) : महसूल विभागाने पकडलेली दोनशे ब्रास वाळू ताबा पावती करून पोलीस पाटल्याच्या ताब्यात दिली होती. ही वाळू गायब झाली असून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी  आहे.

सीना नदीपात्रातून केलेला अवैधरित्या वाळूसाठा अनिल भिमराव माळशिखरे यांनी स्वतःच्या शेतात ठेवला होता यांची माहिती मिळताच तहसीलदार नीलिमा थेऊरकर यांनी प्रत्यक्ष जाऊन पाहणी करून २०० ब्रास वाळू पंचासमक्ष सील करून ५४ लाख १९ हजार २० रूपये दंड केला. खरा पण या घटनेला सहा महिने उलटल्याने हा साठा येथून गायब झाल्याने याला जबाबदार असणाऱ्या महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांची चौकशी करावी.

सील केलेला साठ्याची चोरट्या मार्गाने विल्हेवाट लावणाऱ्या संबंधित मालकावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते नितीन वाघमारे यांनी केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन संबंधित अधिकारी कर्मचारी व वाळूची विल्हेवाट लावणाऱ्यावर कारवाई करावी नसता तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा नितीन वाघमारे यांनी दिला आहे. याबाबत तलाठी अशोक सुरवसे यांना विचारणा केली असता ते म्हणाले की, येथील पोलीस पाटलांकडे ताबा पावती करून साठा दिला होता. पण तो चाेरून नेला असल्याचे त्यांनी  सांगितले. याबाबत तहसीलदार राजाभाऊ कदम यांनी  सांगितले की, या प्रकरणी  कारवाई करण्याचे आदेश दिले जातील.

Web Title: Shocking! Two hundred brass sands seized by the revenue department disappear

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.