धक्कादायक ! तरुणीवर ॲसिड हल्ला करुन पेट्रोलने जाळले, उपचारादरम्यान मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2020 06:13 PM2020-11-15T18:13:54+5:302020-11-15T18:20:54+5:30

बीड जिल्ह्यातील या धक्कादायक घटनेमुळं बीड, नांदेडसह महाराष्ट्र हादरला आहे. नांदेड जिल्ह्याच्या देगलुर तालुक्यातील शेळगावातील येथील सावित्रा दिगंबर अंकुलवार ( वय 22) असं मृत तरुणीचं नाव आहे

Shocking! The young woman was attacked by acid and burned with petrol, dying during treatment | धक्कादायक ! तरुणीवर ॲसिड हल्ला करुन पेट्रोलने जाळले, उपचारादरम्यान मृत्यू

धक्कादायक ! तरुणीवर ॲसिड हल्ला करुन पेट्रोलने जाळले, उपचारादरम्यान मृत्यू

Next

बीड - जिल्ह्यातील येळंब घाट परिसरात प्रेयसीवर अ‍ॅसिड टाकून आणि पेट्रोल ओतून पेटवून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. जखमी अवस्थेत पीडित तरुणीला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे बीडमध्ये खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरू असून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करुन आरोपींवर कडक कारवाईची मागणी केली आहे. 

बीड जिल्ह्यातील या धक्कादायक घटनेमुळं बीड, नांदेडसह महाराष्ट्र हादरला आहे. नांदेड जिल्ह्याच्या देगलुर तालुक्यातील शेळगावातील येथील सावित्रा दिगंबर अंकुलवार ( वय 22) असं मृत तरुणीचं नाव आहे. ती शेळगावातीलच अविनाश राजुरे नावाच्या तरुणासोबत गेल्या काही दिवसांपासून पुण्यात लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. दिनांक 13 नोव्हेंबर रोजी रात्री दोघेही पुण्याहुन गावी परतण्यासाठी दुचाकीवरून जात होते. पहाटे 3 वाजेच्या सुमारास  येळंब (घाट) परिसरात निर्मनुष्य ठिकाणी मांजरसुंबा-केज या मुख्य रस्त्यावरून जात असताना आरोपी तरुणाने गाडी थांबवली. त्यानंतर तरुणाने रस्त्याच्या बाजूला अगोदर तरुणीवर अ‍ॅसिड टाकले, काही वेळाने पेट्रोल टाकून तरुणीला पेटवून दिले. त्यानंतर, आरोपी तरुण घटनास्थळावरून पळून गेला. या घटनेत सावित्रा 48 टक्के भाजली होती.

दम्यान, दुर्दैवी म्हणजे, पहाटे 3 वाजेच्या सुमारास ही घटना घडली होती. तेव्हापासून ही तरुणी रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका खड्यात दुपारी 2 वाजेपर्यंत तडफडत होती. काही वेळानंतर  रस्त्यावर वरून जाणाऱ्यांना आवाज आल्याने खड्यात पहिले असता अर्धवट जळालेल्या तरुणी दिसली. त्यानंतर तातडीने पोलिसांना याबद्दल माहिती देण्यात आली. घटनास्थळी पोलिसांनी पोहोचून पंचनामा केला आणि जखमी तरुणीला स्वत : च्या गाडीतून नेकनूरला नेले तिथून रुग्णवाहिकेनं बीड जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. तिच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले होते. पण, अ‍ॅसिड हल्ला आणि पेट्रोलने 48 टक्के शरीर भाजल्यामुळे तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Web Title: Shocking! The young woman was attacked by acid and burned with petrol, dying during treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.