धक्कादायक, मठातील २९ भक्तांना कोरोनाने घेरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:46 AM2021-02-27T04:46:08+5:302021-02-27T04:46:08+5:30

बीड : गेवराई तालुक्यातील कोल्हेर गावातील येवले वस्तीवर असलेल्या एका मठात कार्यक्रमासाठी आलेल्या ६१ भक्तांची काेरोना चाचणी करण्यात आली. ...

Shockingly, 29 devotees of the monastery were surrounded by corona | धक्कादायक, मठातील २९ भक्तांना कोरोनाने घेरले

धक्कादायक, मठातील २९ भक्तांना कोरोनाने घेरले

Next

बीड : गेवराई तालुक्यातील कोल्हेर गावातील येवले वस्तीवर असलेल्या एका मठात कार्यक्रमासाठी आलेल्या ६१ भक्तांची काेरोना चाचणी करण्यात आली. यातील २९ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. अहवाल प्राप्त होताच आरोग्य पथकाने गावात धाव घेतली आहे. रात्री उशिरापर्यंत हे पथक गावात तळ ठोकून होते.

येवलेवस्ती एक व्यक्ती चार दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटिव्ह आला होता. त्याला भेटण्यासाठी मठातील दोघे गेले होते. त्यांना लक्षणे असल्याने आरोग्य विभागाने या सर्वांची कोरोना चाचणी करण्याच्या सूचना केल्या. त्यावरून शुक्रवारी दिवसभरात ६१ लोकांची चाचणी करण्यात आली. यात तब्बल २९ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. एकाच मठात एवढ्या मोठ्या प्रमाणात कोरोना संसर्ग झाल्याने सायंकाळच्या सुमारास आरोग्य व तालुका प्रशासन गावात पोहचले. तहसीलदार सचिन खाडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संजय कदम, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ.ज्ञानेश्वर निपटे, वैद्यकीय अधिकारी डॉ.मुकेश कुचेरिया हे रात्री उशिरापर्यंत गावात तळ ठोकून होते.

... तर संसर्ग वाढला असता

हे सर्व भक्त दोन दिवसांत दुसऱ्या गावी जाणार होते. परंतु काही लोकांना लक्षणे असल्याने त्यांची चाचणी करण्यात आली होती. वेळीच चाचणी केल्याने हे लोक निष्पन्न झाले. या लोकांची चाचणी न करता ते गेले असते तर दुसऱ्या ठिकाणी कोरोनाचा संसर्ग आणखीनच वाढला असता.

कोट

६१ लोकांची अँटिजेन तपासणी केली होती. यात २९ पॉझिटिव्ह आले. ज्यांचे अँँटिजेन अहवाल निगेटिव्ह आले होते, आता त्यांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात येणार आहे. त्यांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंगही केले जात आहे.

डॉ.आर.बी.पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी, बीड

===Photopath===

260221\262_bed_41_26022021_14.jpeg

===Caption===

येवलेवस्तीवरील मठात रात्री उशिरापर्यंत आरोग्य पथक तळ ठोकून होते. यावेळी तहसीलदार सचिन खाडे, डॉ.संजय कदम, डॉ.ज्ञानेश्वर निपटे, डॉ.मुकेश कुचेरिया आदी.

Web Title: Shockingly, 29 devotees of the monastery were surrounded by corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.