मंजरथकरांचे टॉवरवर ‘शोले’स्टाईल आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2019 11:41 PM2019-02-11T23:41:30+5:302019-02-11T23:42:05+5:30
तालुक्यातील मंजरथ ग्रामपंचायतीच्या कारभाराविरोधात वेळोवेळी उपोषण करून व सतत प्रशासनाकडे तक्र ारी करूनही दखल न घेतल्यामुळे समस्त गावकऱ्यांच्या वतीने सोमवारी ग्रामपंचायत विरोधात गावातील मोबाईल टॉवरवर चढून गावक-यांनी दीड तास शोले स्टाईल आंदोलन केले.
माजलगाव : तालुक्यातील मंजरथ ग्रामपंचायतीच्या कारभाराविरोधात वेळोवेळी उपोषण करून व सतत प्रशासनाकडे तक्र ारी करूनही दखल न घेतल्यामुळे समस्त गावकऱ्यांच्या वतीने सोमवारी ग्रामपंचायत विरोधात गावातील मोबाईल टॉवरवर चढून गावक-यांनी दीड तास शोले स्टाईल आंदोलन केले.
मंजरथ येथील सरपंच ऋतुजा राजेंद्र आनंदगावकर या परराज्यात नोकरी करत असून, ग्रामपंचायतीकडे त्यांचे लक्ष नाही. त्यामुळे या ग्रामपंचायतीला ग्रामसेवकदेखील नाही. यामुळे येथील नागरिकांची अनेक कामे प्रलंबित आहेत. सरपंच व ग्रामसेवकाअभावी येथून कुठलेच काम होत नाही. याविरोधात गावकºयांच्या वतीने नेहमीच उपोषणे, आंदोलने करण्यात आलेली आहेत. परंतु प्रशासन याकडे लक्ष देत नाही. त्यामुळे गावकºयांच्या वतीने प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी गावातील मोबाईल टॉवरवर चढून शोले स्टाईल आंदोलन करण्यता आले. यावेळी रमाई, पंतप्रधान आवास योजनेतील घरकुलांची कामे करा, गावातील स्वच्छता करा, गावाला पाणीपुरवठा व्यवस्थित करा, याठिकाणी ग्रामसेवकाची नियुक्ती करा आदी मागण्या ग्रामस्थांनी लावून धरल्या.
पोलिसांच्या मध्यस्तीनंतर गटविकास अधिकारी बी.टी.चव्हाण यांनी तात्काळ ग्रामसेवक नियुक्त करण्याचे आश्वासन दिले.
१३ महिन्यांत अनेक वेळा विरोधात आंदोलने
माजलगाव तालुक्यातील मंजरथ येथील ग्रामपंचायत ही सधन ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाते. मागील पाच वर्षांपूर्वी येथील सरपंच व सदस्यांनी पाणीपुरवठा योजनेच्या कामात मोठा भ्रष्टाचार केल्याचा आरोप विद्यमान सरपंच ऋतुजा आनंदगावकर यांनी करत यासंदर्भात जिल्हा परिषदेकडे तक्रारीदेखील केल्या होत्या.
चौकशी झाल्यास आपल्यावर गुन्हे दाखल होऊ शकतात अशी भीती ज्यांच्या काळात गैरप्रकार झाले, त्यांना आहे. या पार्श्वभूमीवर म्हणून तत्कालीन सरपंचांनी मागील १३ महिन्यात ऋतुजा आनंदगावकर यांनी चार्ज घेतल्यापासून अनेक वेळा त्यांच्या विरोधात आंदोलने केली.
याबाबत आनंदगावकर यांनी जिल्हा परिषदेकडे अनेक तक्र ारी केल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी १२ मार्च रोजी चौकशी समिती नेमली. परंतु ही समिती अद्याप चौकशीसाठी गावात आलीच नाही.
या ग्रामपंचायतीत पाणीपुरवठा योजनेसाठी ५० लक्ष रु पये खर्च झाले होते. तर आता आजी माजी सरपंचाच्या वादात चौदाव्या वित्त आयोगातून आलेला २१ लक्ष रु पयांचा निधी मागील एक वर्षापासून धूळ खात पडून आहे. यामुळे गावचा विकास खुंटला आहे.