जहागीर मोहा गावात ‘मुन्नाभाई’चे दुकान बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 11:56 PM2019-03-28T23:56:04+5:302019-03-28T23:57:29+5:30

कुठलाही परवाना नसताना राजरोसपणे वैद्यकीय सेवा देणाऱ्या ‘मुन्नाभाई’चा पर्दाफाश करण्यात आले आहे. धारूरच्या तालुका आरोग्य पथकाने गुरूवारी धारूर तालुक्यातील जहागिरमोहा येथे ही कारवाई केली.

The shop of 'Munnabhai' was closed in Mohagir Moha village | जहागीर मोहा गावात ‘मुन्नाभाई’चे दुकान बंद

जहागीर मोहा गावात ‘मुन्नाभाई’चे दुकान बंद

Next
ठळक मुद्देआरोग्य पथकाची कारवाई : धारूर ठाण्यात बोगस डॉक्टरवर गुन्हा दाखल

बीड / धारुर : कुठलाही परवाना नसताना राजरोसपणे वैद्यकीय सेवा देणाऱ्या ‘मुन्नाभाई’चा पर्दाफाश करण्यात आले आहे. धारूरच्या तालुका आरोग्य पथकाने गुरूवारी धारूर तालुक्यातील जहागिरमोहा येथे ही कारवाई केली. संबंधित बोगस डॉक्टरवर धारूर ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, बोगस डॉक्टरने घटनास्थळावरून पलायन केले.
मोनोतोसे रॉय (रा.जहागिरमोहा ता.धारूर) असे गुन्हा दाखल झालेल्या मुन्नाभाईचे नाव आहे. सूत्रांच्या माहितीनुसार रॉय हा मागील सहा महिन्यांपासून जहागीर मोहा येथे वास्तव्यास आहे. येथेच एका खोलीत त्याने दवाखाना सुरू केला होता. रॉयकडे वैद्यकीय सेवा देण्याचा देण्याचा कसलाही परवाना नव्हता. तरीही तो राजरोसपणे गावात उपचार करून नागरिकांची आर्थिक लूट करत असे.
याबाबत एका व्यक्तीने जिल्हा अरोग्य अधिकारी डॉ.राधाकृष्ण पवार यांच्याकडे तक्रार केली. त्यांनी तात्काळ धारूर तालुका आरोग्य अधिकारी डॉ.एस.डी.शेकडे यांना आदेश देऊन पथक नियूक्त केले. या पथकात नायब तहसीलदार एन.टी.विटेकर, सहा.फौजदार आर.एल.राठोड, पोना वडमारे, आरोग्य विस्तार अधिकारी एन.एच.पटेकर, आरोग्य सहायक एस.डब्ल्यू मांडवे आदींचा समावेश होता. डीएचओ डॉ.पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
गुरूवारी सकाळी साडेदहा वाजता हे पथक गावात धडकले. सेवा देत असलेल्या खोलीत तपासणी करीत असतानाच काही ग्रामस्थ तिथे आले. त्यांनी पथकाला अडविण्याचा प्रयत्न केला. पथकाने समजुत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र ग्रामस्थ जास्तच आक्रमक झाले. पथकाला खोलीतून बाहेर काढले. पथकाने हा विरोध झुगारून खोलीतील सर्व साहित्य जप्त केले. त्यानंतर धारूर ठाणे गाठून फिर्याद दिली. भोगलवाडी प्रा.आ.केंद्राचे वैद्यकीय अधिकारी गणेश मुंडे यांच्या फिर्यादीवरून रॉय विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आंबेवडगावातील डॉक्टर भीतीने फरार
जहागीर मोहा येथील कारवाई झाल्यानंतर पथक आंबेवडगाव येथे पोहोचले. मात्र पथक येणार असल्याची माहिती या डॉक्टरला अगोदरच समजली असावी, म्हणून तो घर बंद करून पसार झाला होता. पथक त्याच्या घराला नोटीस चिटकवून परतले. दरम्यान, पाच वर्षापूर्वी याच गावात डॉ.विश्वास नामक मुन्नाभाईवर गुन्हा दाखल झाला होता.

Web Title: The shop of 'Munnabhai' was closed in Mohagir Moha village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.