केजमध्ये नियम मोडणाऱ्या दुकानदारांना ३६ हजारांचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:33 AM2021-05-13T04:33:46+5:302021-05-13T04:33:46+5:30
केज : शहरात किराणा दुकानासह इतर जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी दुकानांवर गर्दी झाल्याने तीन किराणा दुकानांसह अन्य पाच दुकानदारांवर ...
केज : शहरात किराणा दुकानासह इतर जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी दुकानांवर गर्दी झाल्याने तीन किराणा दुकानांसह अन्य पाच दुकानदारांवर दंडात्मक कारवाई करून त्यांच्याकडून ३६ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
लॉकडाऊनमध्ये केज शहरात मंगळवारी सकाळच्या सत्रात सूट देण्यात आल्याने नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती. या गर्दीला आवर घालण्यासाठी तहसीलदार दुलाजी मेंडके, नायब तहसीलदार सचिन देशपांडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे, तलाठी लहू केदार, पोलीस नाईक धनपाल लोखंडे, नगर पंचायतीचे स्वछता निरिक्षक असद खतीब, अनिल राऊत, सय्यद अन्वर, आयुब पठाण, अमर हजारे, सय्यद अतिक, शेख आझाद, वट्टे, हाजबे, पोटे, कळे यांनी शहरात फिरून रस्त्यावरील आणि किराणा दुकानांवरील गर्दी कमी करण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, गर्दी कमी करण्यासंबंधी सूचना देऊनही किराणा दुकानांवर गर्दी दिसून आल्याने तीन किराणा दुकानदारांना प्रत्येकी ५ हजार रुपये दंड करण्यात आला तर इतर पाच दुकानदारांनी नियमांचे उल्लंघन करून दुकाने उघडल्याने दंडात्मक कारवाई करण्यात आली. शहरातील आठ दुकानदारांकडून ३६ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.