शिथिल वेळेनंतरही दुकाने उघडी; ९ व्यापाऱ्यांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:33 AM2021-04-27T04:33:48+5:302021-04-27T04:33:48+5:30

जिल्ह्यात कोरोना रोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात किराणा, मेडिकल, दवाखाने अत्यावश्यक सेवेच्या अस्थापनांना फक्त सकाळी ७ ते ...

Shops open even after relaxing hours; Action against 9 traders | शिथिल वेळेनंतरही दुकाने उघडी; ९ व्यापाऱ्यांवर कारवाई

शिथिल वेळेनंतरही दुकाने उघडी; ९ व्यापाऱ्यांवर कारवाई

Next

जिल्ह्यात कोरोना रोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात किराणा, मेडिकल, दवाखाने अत्यावश्यक सेवेच्या अस्थापनांना फक्त सकाळी ७ ते ११ यावेळी शिथिलता दिली आहे; मात्र या वेळेनंतरही शहरातील काही दुकाने उघडी राहत असल्याने सोमवार रोजी नगर परिषद अधिकारी व कर्मचारी यांनी शहरातील ९ दुकानचालकांना प्रत्येकी ५०० रुपये दंड आकारला. यावेळी नगर परिषदेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या कारवाईमुळे नियमांचे उल्लंघन करून दुकाने उघडणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. शहरातील व्यापारी बांधवांनी शासनाने ठरवून दिलेल्या वेळेतच दुकाने चालू व बंद कराव्यात, तसे शासनाच्या नियमाचे पालन करावे, नसता दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागेल, असे आवाहन नगर परिषदेचे अधिकारी व्ही. टी. तिडके यांनी सांगितले. या कारवाईत नगर परिषदेचे अधिकारी डी.एम. वाघ, कर्मचारी नाना कटारनवरे, राम सौंदरमल, नसिरोद्दीन अहमंद, दीपक साळवे, संतोष मोटे, संतोष सौदंरमल, प्रकाश रानमारेसह अनेक जण उपस्थित होते.

फोटो ओळी : गेवराईत लॉकडाऊनच्या शिथिल वेळेनंतरही दुकाने बंद न करता उघडी ठेवल्याबद्दल नगर परिषदेच्या पथकाने ९ दुकानांवर कारवाई केली.

===Photopath===

260421\20210426_122907_14.jpg

Web Title: Shops open even after relaxing hours; Action against 9 traders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.