लॉकडाऊनमध्ये दुकाने उघडे; ३९ हजारांचा दंडवसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:32 AM2021-05-01T04:32:42+5:302021-05-01T04:32:42+5:30
बीड : कोरोनाची चेन ब्रेक करण्यासाठी नियमावली जाहिर करून कडक निर्बंध केले. तरीही काही लोक लॉकडाऊनचे उल्लंघन करून दुकाने ...
बीड : कोरोनाची चेन ब्रेक करण्यासाठी नियमावली जाहिर करून कडक निर्बंध केले. तरीही काही लोक लॉकडाऊनचे उल्लंघन करून दुकाने उघडत आहेत. याच अनुषंगाने शुक्रवारी नगरपालिकेने कारवाया करून ३९ हजारांचा दंड वसूल केला. तहसीलदार व मुख्याधिकारी हे पथकासह दिवसभर रस्त्यावर फिरून कारवाया करीत होते.
सध्या कोराेनाची वाढती रूग्णसंख्या चिंतेचा विषय बनत आहे. राज्य व जिल्हा स्तरावरून विविध कडक उपाययोजना केल्या जात आहेत. नागरिकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यासह काळजी घेण्याबाबत सांगितले जात आहे. तरीही काही लोक व व्यापारी या नियमांचे उल्लंघन करून गर्दी करताना दिसत आहेत. हाच धागा पकडून शुक्रवारी तहसीलदार शिरीश वमने व मुख्याधिकारी डॉ.उत्कर्ष गुट्टे यांनी शहरात फिरून दुकाने उघडणाऱ्यांवर कारवाया केल्या. ज्यांनी चूक मान्य केली त्यांच्याकडून २०० रूपये दंड वसूल केला. तर ज्यांनी हुज्जत घातली, अडथळा निर्माण केला. त्यामुळे त्यांना दंडाधिकारी या अधिकारात तहसीलदारांनी पाच हजार रूपयांपर्यंत दंड वसूल केला. दिवसभर या कारवाया सुरूच होत्या. शुक्रवारी दिवसभरात ३९ हजार ६०० रूपये दंड वसुल केल्याचे मुख्याधिकारी डॉ.गुट्टे यांनी सांगितले. कारवाईत पालिकेचे युवराज कदम, भागवत जाधव, प्रशांत ओव्हाळ, महादेव गायकवाड, रूपकांत जोगदंड, मुन्ना गायकवाड, राजू वंजारे आदींचा समावेश होता.
===Photopath===
300421\30_2_bed_20_30042021_14.jpeg
===Caption===
बीड शहरात दुकाने उघडणारांवर दंडात्मक कारवाई करताना मुख्याधिकारी डॉ.उत्कर्ष गुट्टे. सोबत पालिकेचे पथक