नगरसेवकांचे आंदोलन दिखाऊ, दिशाभूल करू नये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:34 AM2021-03-26T04:34:05+5:302021-03-26T04:34:05+5:30
: विलंब शुल्क माफीचा प्रस्ताव नगरपरिषदेने पुर्वीच जिल्हाधिका-यांकडे पाठवला अंबाजोगाई :उपोषणकर्त्यांनी विधायक मागणीसाठी ठिय्या केला आहे. परंतु,हे दिखावू ...
: विलंब शुल्क माफीचा प्रस्ताव नगरपरिषदेने पुर्वीच जिल्हाधिका-यांकडे पाठवला
अंबाजोगाई :उपोषणकर्त्यांनी विधायक मागणीसाठी ठिय्या केला आहे. परंतु,हे दिखावू आंदोलन केवळ राजकिय भांडवलासाठी केले आहे. पाणीपट्टी व मालमत्ता करासंदर्भात लागणारे विलंब शुल्क माफ करावे अशी मागणी त्यांनी केली आहे. त्या संबंधीचा प्रस्ताव नगरपरिषदेने यापूर्वीच जिल्हाधिकारी,बीड यांना पाठविलेला आहे.यात सहा महिन्यांचा म्हणजे कोरोना काळातील मालमत्ता कर आणि पाणीपट्टी विलंब शुल्क माफ करावे असा ठराव नगरपरिषदेने बहुमताने घेतलेला असल्याचे प्रभारी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी म्हटले आहे.
हे सर्व उपोषणकर्त्यांना माहित असतानाही केवळ राजकीय भांडवल करून आपण सक्रिय आहोत हे दाखविण्याचा उपोषणकर्त्यांचा हा केविलवाणा प्रयत्न असल्याचे मोदी यांनी नमूद केले आहे.
अंबाजोगाई शहरात लॉकडाऊन काळात ही म्हणजे २६ मार्चपासून सॅनिटायझर फवारणी केली जाणार आहे.मागील पंधरा दिवसांपासून रात्री संचारबंदी सुरू आहे. परंतु,दिवसा नागरिक हे मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर होते. रहदारी आणि वर्दळी दरम्यान सॅनिटायझर फवारणी होवू शकते का ? असा सवाल मोदी यांनी उपस्थित केला आहे. आम्हालासुद्धा अंबाजोगाईकरांच्या आरोग्याची व लोकहिताची काळजी आहे. विनाकारण भावनिक मुद्दे उपस्थित करून राजकारण करू नये. अंबाजोगाईकरांची दिशाभूल करू नये,अशी अपेक्षा राजकिशोर मोदी यांनी यावेळी व्यक्त केली आहे.