आज सखींसाठी श्रावण सखी महोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2019 12:22 AM2019-08-18T00:22:00+5:302019-08-18T00:22:21+5:30
खास सखी मंच सदस्यांसाठी श्रावण सखी महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : खास सखी मंच सदस्यांसाठी श्रावण सखी महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे. १८ आॅगस्ट रोजी दुपारी ३ वाजता अंबाजोगाई येथील आद्यकवी मुकुंदराज सभागृहात उखाणा स्पर्धा, गायन, डान्स, आनंदनगरी, मेहंदी स्पर्धा आदींचे आयोजन श्रावण सखी महोत्सवादरम्यान करण्यात आले आहे.
तसेच धारुर येथे २४ आॅगस्ट रोजी माऊली मंगल कार्यालयात, परळी येथे २५ आॅगस्ट रोजी नटराज रंग मंदिरात, तर २६ आॅगस्ट रोजी माजलगाव येथे माँ वैष्णवी मंगल कार्यालयात, २७ आॅगस्ट रोजी बीड येथे यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात, तसेच २८ आॅगस्ट रोजी गेवराई, ३१ आॅगस्ट रोजी केज येथील शिक्षक सहकारी पतसंस्था येथे आयोजन करण्यात आले आहे. सखी मंच सदस्यांना वरीलपैकी कोणत्याही एकाच स्पर्धेत सहभाग घेता येणार आहे.
अधिक माहितीसाठी व आनंदनगरीमध्ये स्टॉल बुकिंगसाठी ९६५७१०२१७८ या क्रमाकांवर संपर्क साधण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.
अशा होतील स्पर्धा
गायन स्पर्धा : कोणतेही हिंदी / मराठी गाणे (वेळ ३ मिनिटे)
नृत्य स्पर्धा : कोणत्याही मराठी / हिंदी गाण्यावर नृत्य करणे (वेळ ४ मिनिटे)
उखाणे स्पर्धा : एका मिनिटात जास्तीत जास्त उखाणे सादर करणे.
मेहंदी स्पर्धा : मेहंदीचा कोन सखींनी स्वत: आणावयाचा आहे. मेहंदीसाठी सखींनी त्यांच्या मैत्रिणीला सोबत आणावे. (वेळ ४५ निमिटे)
आनंदनगरी : यामध्ये सखी मंच सदस्य स्वत:चा स्टॉल लावून सहभागी होऊ शकतात. यामध्ये खाद्यपदार्थ, ज्वलेरी, सौंदर्य प्रसाधने, कपडे आदी स्टॉल लावता येतील.