बीडमध्ये ६१ सर्वधर्मीय जोडप्यांचे शुभमंगल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2018 12:37 AM2018-05-13T00:37:53+5:302018-05-13T00:37:53+5:30
आर्थिक विवंचनेत त्रस्त शेतकरी व गरजु कुटुंबांना आधार देत त्यांच्या पाल्यांचा विवाह व्हावा म्हणून राज्याचे धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांच्या संकल्पनेतून शनिवारी बीड येथील जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर एकाच मांडवात सर्वधर्मीय ६१ जोडप्यांचे हजारो वºहाडींच्या साक्षीने शुभमंगल झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : आर्थिक विवंचनेत त्रस्त शेतकरी व गरजु कुटुंबांना आधार देत त्यांच्या पाल्यांचा विवाह व्हावा म्हणून राज्याचे धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांच्या संकल्पनेतून शनिवारी येथील जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर एकाच मांडवात सर्वधर्मीय ६१ जोडप्यांचे हजारो वºहाडींच्या साक्षीने शुभमंगल झाले.
बुधवारपासून अधिकमासाला प्रारंभ होणार असल्याने लग्नाचा अखेरचा मुहूर्त असल्याने सर्वत्र धूम असताना या लग्नसोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थिती होती. सामाजिक जाणिवेतून राबविलेल्या या उपक्रमाने शहरातील आतापर्यंतच्या सामुहिक विवाहाचे विक्रम तर तोडले तसेच जातीय सलोख्याचा संदेशही दिला. १२२ कुटुंबांना यामुळे आधार झाला असून मोठी सामाजिक बचत झाली आहे.
शेतकरी, शेतमजुरांच्या तसेच आर्थिक बाबतीत कमकुवत असलेल्या कुटुंबातील मुला- मुलींचे लग्न व्हावे या अनुषंगाने धर्मादाय संस्थेअंतर्गत येणाऱ्या धार्मिक व सामाजिक तसेच शैक्षणिक संस्थांना सर्वधर्मीय सामुहिक विवाहासाठी आर्थिक तसेच इतर पातळीवर मदतीचे आवाहन केले होते. जिल्ह्यात बीड आणि परळी येथे विवाहांचे आयोजन केले. परळी येथे ८ मे रोजी ३८ जोडप्यांचे शुभमंगल झाले. त्यानंतर शनिवारी बीडमध्ये हा विवाह सोहळा पार पडला.
मागील एक महिन्यापासून या विवाहाची तयारी सुरु होती. बैठकांवर बैठका होऊन नियोजन करण्यात आले. यातून एक सक्षम चळवळ उभी राहिली. गरजू कुटुंब शोधून त्यांच्या पाल्यांचे लग्न जुळविण्यापासून विवाह समितीमधील सदस्यांनी प्रयत्न केले. एकूण ६१ जोडप्यांच्या वतीने नोंदणी करण्यात आली.
या सोहळ्यासाठी वधू- वर निवास, भोजन, पाणी, व्यासपीठ, वाहतूक, अक्षता, व-हाडी स्वागत समित्यांचे गठन केले. समित्यांमध्ये सर्वधर्मीय, सर्वपक्षीय सामाजिक कार्यकर्त्यांचा समावेश होता. या उपक्रमासाठी श्रीक्षेत्र नारायणगड संस्थानने ५ लाख रुपये, तलवाडा येथील जगदंबा ट्रस्टने १ लाख ११ हजार रुपये योगेश्वरी देवस्थानने १० लाख रुपये योगदान दिले. कपीलधार संस्थानच्या वतीने सामुहिक विवाहासाठी आलेल्या वºहाडींच्या भोजनाचा खर्च दिला. आदर्श मार्केट व्यापारी संघटनेने दुकाने बंद ठेवून नियोजित समितीसोबत भोजन व्यवस्था सांभाळली.
धर्मादाय सामुहिक विवाह समितीचे सचिव विजयराज बंब यांच्या वतीने सहभागी वधुंसाठी मंगळसूत्र तर वरराजाच्या सफारीसाठी प्रफुल्ल पोरवाल यांनी सहयोग दिले. परळी येथील नाथ प्रतिष्ठानने नवदाम्पत्यांसाठी राजाराणी कपाट, मंडपासाठी आ. विनायक मेटे यांनी दोन लाख रुपये योगदान दिले. समितीकडे जमा निधीतून नवदाम्पत्यांना गादी, पलंग व संसारोपयोगी साहित्य देण्यात आले. नगर पालिकेकडून निवास व्यवस्थेसाठी जाागा उपलब्ध केली होती. हिना फंक्शन हॉलनेही जागा दिली होती. जिल्हा प्रशासनाने जिल्हा क्रीडा संकुलाची जागा या सोहळ्यासाठी उपलब्ध करुन दिली.
दरम्यान, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शिवाय, संयोजन समितीचे ५०० वर स्वयंसेवक नियोजनासाठी कार्यरत असल्याचे दिसून आले.
बीड जिल्ह्यात दोन सोहळे
धर्मादाय आयुक्तांच्या संकल्पनेला राज्यातील बहुतांश संस्थांकडून प्रतिसाद मिळाला. प्रत्येक जिल्ह्यात एक सोहळा पार पडला. बीड जिल्ह्याची भौगोलिक रचना लक्षात घेत ८ मे रोजी परळी तर १२ मे रोजी बीड येथे अशा दोन सोहळ्यात एकूण ९९ जोडप्यांचे शुभमंगल झाले.
बालविवाह टाळले
सामुहिक विवाह सोहळ्यासाठी आयोजन समितीचे विजयराज बंब, माजी. आ. राजेंद्र जगताप, अशोक हिंगे, शिवसेनेचे बाळासाहेब पिंगळे, कल्याण आखाडे आदींनी दौरे केले. या दौºयात प्रस्ताव येणाºया उपवरांच्या वयाची माहिती घेत बालविवाह होऊ देऊ नका. एकदोन वर्ष थांबा असा सल्ला देत प्रबोधन केले. तर १८ वर्ष पूर्ण झालेल्यांचाच प्रमाणपत्राद्वारे खात्री करुन या सोहळ्यात समावेश केला. सायंकाळी वाºयामुळे विवाहस्थळ परिसरातील आसन व्यवस्था करताना आयोजकांना अडथळे आले. माळीवेस येथील हनुमान मंदिरापासून परण्या मिरवणूक काढण्यात आली. आधी मुस्लिम, नंतर बौद्ध, ख्रिश्चन आणि नंतर हिदू जोडप्यांचे विवाह झाले.