'चूप बैठो,हम कोरोना टेस्ट कर रहे है'; म्हणत वृद्ध दाम्पत्याला मारहाण करून लुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2021 02:30 PM2021-12-02T14:30:48+5:302021-12-02T14:33:22+5:30
घरात घुसून शस्त्राचा धाक दाखवत दरोडा
माजलगाव : माजलगाव शहराच्या हद्दीत असणार्या भाटवडगाव येथील शिक्षक कॉलनीत आज गुरुवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास दरोडा पडला.यावेळी सहा अज्ञात दरोडेखोरांनी 'चुप बैठो हम कोरोना टेस्ट कर रहे है' म्हणत घरातील वृद्ध दाम्पत्यास शस्त्राचा धाक दाखवून काठीने मारहाण केली.यावेळी दरोडेखोरांनी घरातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रकमेची लूट करून पोबारा केला.
शेतकरी कुटुंबातील लक्ष्मणराव शिंदे व सावित्री लक्ष्मण शिंदे हे वृंद दाम्पत्य आपल्या तीन विवाहित मुला , सुना व नातवंडसह भाटवडगाव येथील शिक्षक कॉलनीत राहतात.बुधवारी रात्री 11 च्या दरम्यान मोठा मुलगा राजेश शिंदे घरी उशिरा आले.व घराच्या मेन गेटला आतून कुलूप लाउन आपल्या पत्नीसह वरच्या मजल्यावर झोपण्यासाठी गेले.दरम्यान खालच्या हॉल मध्ये वृद्ध असणारे संजीवनीबाई व लक्ष्मणराव झोपून गेले.पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास घराच्या मेन गेटचे कुलूप तोडत असल्याचा आवाज शिंदे वृद्ध दांपत्याला झाला.
दरम्यान 6 अज्ञात दरोडेखोरांनी दरवाजा तोडत घरात प्रवेश केला. शिंदे दाम्पत्याने आरडाओरडा करण्याचा प्रयत्न करतातच शस्त्राचा धाक दाखवून त्यांना हातातील काठीने मारहाण करण्यास सुरुवात केली.चुप बैठो हम यहा कोरोना टेस्ट कर रहे है,असे दरडावून म्हणत. घरातील सामानाची नासधूस करत कपाटात धुंडाळले.यावेळी त्यांना कपाटातील ड्रावर मध्ये 60 हजार रु.किंमतीचे एक सोन्याची साखळी, 40 हजार रु.किंमतीचे एक सोन्याची पिळ्याची अंगठी,10 ग्रॅम वजनाची जु.वा. 20 हजार रु. किंमतीचे एक सोन्याची पिळ्याची अंगठी,5 ग्रॅम वजनाची 40 रु. किंमतीचे एक सोन्याचा गंठन,10 ग्रॅम वजनाचा 22 हजार रु.किंमतीचे एक सोन्याचे मनीमंगळसुत्र,5.5 ग्रॅम वजनाचे काळ्या मनीमध्ये ओवलेले 52 हजार रु.किंमतीचे एक जोड, सोन्याचे वेल व झुंबर 13 ग्रॅम वजनाचे एक सोन्याचे लहान मुलाचे कानातील कुडक पाऊन ग्रॅम वजनाचे 2 हजार रु.किमतीचे लहान मुलांचे चांदीचे चैन व वाळे 10 ग्रॅम वजनाचे रक्कम त्यामध्ये 500 रु दराच्या 16 नोटा एकुण 2 लाख,47 हजार रु किंमतीचे सोन्या चांदीचे दागीने व रोख रखमीची लूट केली. व घराला बाहेरून बंद करून घरातून पोबारा केला.दरम्यान या दरोड्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे.
अज्ञात दरोडेखोरांविरोधात माजलगाव शहर पोलीस ठाण्यात संजीवनी लक्ष्मण शिंदे यांच्या फिर्यादीवरून दरोडयाचा गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पो.नि.धनंजय फराटे करत आहेत.