बारा वाजले की दुकानांचे शटर डाऊन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:20 AM2021-07-23T04:20:58+5:302021-07-23T04:20:58+5:30
कोरोनाबाधित गावातील लोकांना कोण रोखणार? शिरूर कासार : शहरात कोरोनाबाधितांचा आकडा नगण्य असला तरी तालुक्याचे ठिकाण व व्यवहाराचे केंद्रस्थान ...
कोरोनाबाधित गावातील लोकांना कोण रोखणार?
शिरूर कासार : शहरात कोरोनाबाधितांचा आकडा नगण्य असला तरी तालुक्याचे ठिकाण व व्यवहाराचे केंद्रस्थान असल्याने तालुक्यातून वर्दळ असते. त्यात कोरोनाबाधित गावच्या लोकांचाही समावेश असतो. त्यांना कोण रोखणार, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडत असून प्रशासनाने उपाय करण्याची मागणी आहे.
पावसाची रोजच रिपरिप
शिरूर कासार : तालुक्यात पाऊस रोजच पडत असला तरी ओढे, नाले, कोरडेच आहेत. मोठा पाऊस पडत नाही आणि आहे तो उघडतही नाही. रिपरिप पावसामुळे रस्ते चिखलमय झाले आहेत. तर शेतकामातही वापसा मोड झाल्याने खंड पडत असल्याचे दिसत आहे.
श्रीक्षेत्र भगवानगडावरील गुरूमंत्र कार्यक्रम स्थगित
शिरूर कासार : हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र भगवान गडावर प्रत्येक वर्षी गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरूमंत्र देण्याची परंपरा संत भगवानबाबांनी सुरू केली होती. मात्र याही वर्षी कोरोना परिस्थितीमुळे गुरूमंत्र देण्याचा कार्यक्रम स्थगित केल्याचे भगवान गडाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. कोरोना महामारीचे गांभीर्य लक्षात घेऊन भाविकांनी गडावर येऊ नये, असे आवाहन महंत न्यायाचार्य डॉ. नामदेव शास्त्री यांनी केले आहे.
फोटो संत भगवान बाबा