‘आजारी’ आरोग्यवर्धिनी उप केंद्र सीएचओंमुळे ‘सुदृढ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:31 AM2021-02-12T04:31:21+5:302021-02-12T04:31:21+5:30

- फोटो बीड : जिल्ह्यातील आरोग्यवर्धिनी उपकेंद्रांची दुरवस्था झाली होती. तेथे सुविधा मिळत नव्हत्या. परंतु मागील दोन महिन्यांपासून येथे ...

'Sick' healthcare sub-center 'healthy' due to CHOs | ‘आजारी’ आरोग्यवर्धिनी उप केंद्र सीएचओंमुळे ‘सुदृढ’

‘आजारी’ आरोग्यवर्धिनी उप केंद्र सीएचओंमुळे ‘सुदृढ’

Next

- फोटो

बीड : जिल्ह्यातील आरोग्यवर्धिनी उपकेंद्रांची दुरवस्था झाली होती. तेथे सुविधा मिळत नव्हत्या. परंतु मागील दोन महिन्यांपासून येथे समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांची नियुक्ती केल्यामुळे हे उपकेंद्र सुदृढ बनले आहेत. प्रत्येक १४ सीएचओंमागे १ समन्वयक नियुक्त करण्यात आला आहे. याचा दररोज जिल्हा स्तरावरून आढावा घेतला जात आहे.

जिल्ह्यात ५२ प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. त्याअंतर्गत २९७ आरोग्य उप केंद्र आहेत. या उप केंद्राचे रूपांतर मागील वर्षीपासून आरोग्यवर्धिनी उपकेंद्रात केले आहे. याच उप केंद्रांवर २३९ सीएचओंची नियुक्ती केलेली आहे. पूर्वी अनेक ठिकाणच्या उप केंद्रांना अवकळा आली होती. इकडे काेणी फिरकत नसल्याने सर्वत्र दुरवस्था झाली होती. घाणीचे साम्राज्यही पसरले होते. परंतु आता सीएचओंची नियुक्ती केल्याने आरोग्य केंद्राप्रमाणेच उपकेंद्रही चमकू लागले आहेत. येथे नियमित ओपीडी काढली जात आहे. किरकोळ आजारांवर उपचार केले जातात. तसेच शासनाचे विविध कार्यक्रम आणि उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी होत आहे. हे सर्व सीएचओ नियमित उप केंद्रात हजर राहत आहेत. त्यांची हजेरी घेतली जात आहे. यासाठी १४ सीएचओंमागे एका समन्वयकाची नियुक्ती केली आहे. त्यांची हजेरी, लोकेशन, उपस्थिती दररोज घेतली जात आहे. तसेच दररोज व्हिडिओ काॅन्फरन्सद्वारे आरोग्य विभागाच्या योजना आणि कार्यक्रमांची माहिती दिली जात आहे. नोडल ऑफिसर म्हणून डॉ.अजय राख यांची नियुक्ती केलेली आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार यांच्याकडूनही याचा नियमित आढावा घेतला जात आहे.

कोट

सीएचओंमुळे शासनाच्या योजना आणि कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यात यश येत आहे. त्यांच्यामुळे उप केंद्रांना खरोखरच चकाकी मिळाली आहे. सर्वच लोक जोमाने काम करीत आहेत. अडचणी सोडविण्यासह कार्यक्रमांची माहिती देण्यासाठी समन्वयक नियुक्त केले आहेत. त्यांची दररोज हजेरी घेतली जात आहे.

-डॉ.आर.बी.पवार

जिल्हा आरोग्य अधिकारी, बीड

Web Title: 'Sick' healthcare sub-center 'healthy' due to CHOs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.