सुविधांमुळे सिद्धीविनायक संकुल परिसर ‘हार्ट आॅफ सिटी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2019 12:16 AM2019-10-16T00:16:26+5:302019-10-16T00:17:06+5:30
सहयोगनगर, स्नेहनगरची मागील काळात काय परिस्थिती होती याची आपल्या सर्वांना कल्पना असून, सिध्दीविनायक संकुलाच्या उभारणीनंतर या भागाची ‘हार्ट आॅफ सिटी’ म्हणून ओळख निर्माण झाल्याचे प्रतिपादन नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी केले.
बीड : पूर्वी लग्नाचा बस्ता बांधण्यासाठी आपल्याला बाहेरगावी जावे लागत होते. पण शहरात व्यापाऱ्यांना सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे शहरातील बाजारपेठा फुलत आहेत. सहयोगनगर, स्नेहनगरची मागील काळात काय परिस्थिती होती याची आपल्या सर्वांना कल्पना असून, सिध्दीविनायक संकुलाच्या उभारणीनंतर या भागाची ‘हार्ट आॅफ सिटी’ म्हणून ओळख निर्माण झाल्याचे प्रतिपादन नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी केले.
शिवसेना, भाजपा, मित्रपक्षाचे अधिकृत उमेदवार जयदत्तअण्णा क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ शहरातील स्नेहनगर भागातील दिलीप लोढा यांच्या निवासस्थानी कॉर्नर बैठकीत ते बोलत होते. याप्रसंगी जेष्ठ विधिज्ञ अॅड.कालीदास थिगळे, नगरसेवक विष्णू वाघमारे, बाळासाहेब अंबेकर, सत्यनारायण कासट, महावीर समदरिया, राजेश बंब, पारस छाजेड, मनोज कोटेचा, आनंद छाजेड, दिलीप लोढा, प्रकाश दामा आदींची उपस्थिती होती.
यावेळी डॉ.क्षीरसागर म्हणाले, १९८५ पासून शहराचा नगराध्यक्ष म्हणून काम करीत असून, मला कधीही आमदारकीचे स्वप्न पडले नाही. स्व.काकू- नानानंतर अण्णा हे घराचे कर्ते आणि मोठे बंधू असून, आम्ही घराची परंपरा पाळण्याचे काम केले. रा.काँ.पक्षाने घरात दुही निर्माण केली तर तब्बल चार निवडणुकीत पडलेल्यांना विरोधी पक्ष नेता केले तर जनतेतून निवडून आलेल्या अण्णांची पक्षात नेहमीच अवहेलना झाली. या बाबीला कंटाळून पक्ष सोडण्याचा निर्णय झाला.
शिवसेना कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांनी अण्णांना मंत्रीपदाची संधी दिली. मुख्यमंत्री फडणवीस आणि पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी एकाच बैठकीत जिल्ह्यासह शहर विकासासाठी भरघोस निधी दिला. आमच्या परिवाराने कधीही जाती, पातीचे राजकारण केले नाही तर स्व.काकूंनी दिलेल्या मानवता धर्माच्या आदर्श शिकवणीचे पालन करीत असल्याचे ते म्हणाले.
शहरातील सुभाष रोड, सहयोगनगर, बसस्टँडच्या मागील काँक्र ीट रस्त्याचे काम झाले असून, दळणवळणाची सोय झाली असून, सटवाई मैदान, मित्रनगर, नाट्यगृह रोडवरील रस्त्याचे काम प्रगतीपथावर आहे. केंद्रात महायुतीचे सरकार असून राज्यातही युतीचेच सरकार येणार आहे. नव्याने येणाºया सरकारमध्ये अण्णा हे कॅङ्मबनेटमंत्री होणार असून, त्याचा लाभ आपल्याला शहराच्या स्थैर्य आणि विकासासाठी होणार असल्याचे नगराध्यक्ष डॉ. क्षीरसागर म्हणाले.