चौकातील सिग्नल बंदच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:35 AM2021-01-19T04:35:49+5:302021-01-19T04:35:49+5:30
बीड : शहरातील सिग्नल अनेक दिवसांपासून बंद असल्याने वारंवार वाहतुकीची कोंडी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. सिग्नल सुरू ...
बीड : शहरातील सिग्नल अनेक दिवसांपासून बंद असल्याने वारंवार वाहतुकीची कोंडी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. सिग्नल सुरू करावेत, यासाठी वाहनधारक व नागरिकांनी अनेक वेळा मागणी करूनही सिग्नल सुरू न झाल्याने वाहतूककोंडी कायम आहे.
पथदिवे बंदच
बीड : शहरातील मुख्य रस्त्यांवर, तसेच अंतर्गत भागातील पथदिवे रात्रीच्या वेळी बंद असतात. त्यामुळे नागरिकांना मार्गस्थ होणे अवघड होते. कबाडगल्ली, बुंदेलपुरा, जव्हेरी गल्ली, मोमीनपुरा भागामध्ये काही पथदिवे बंद असल्यामुळे नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे. पथदिवे दुरुस्तीची मागणी होत आहे.
वाहने हटविण्याची मागणी
तेलगाव : येथील चौफाळा परिसरात अवैध प्रवासी वाहतूक करणारी वाहने रस्त्यावरच उभी राहतात. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. यामुळे कधी-कधी वादाचेही प्रसंग उद्भवत आहेत. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने संताप व्यक्त होत आहे. ही वाहने हटविण्याची मागणी होत आहे.
दुचाकीस्वार त्रस्त
सिरसाळा : परळी ते सिरसाळा मार्गावर धावत असलेल्या राखेच्या वाहनांमुळे दुचाकीस्वार त्रस्त झाले आहेत. चष्मा लावूनही डोळ्यामध्ये राखेचे कण जात आहेत, तसेच वारा सुटला की, त्या भट्ट्यावरील राख हवेत मिसळत असून, रस्त्यांवर राखेचे प्रदूषण होत आहे. राखेचे प्रदूषण थांबविण्याची मागणी आहे.
जादा भाडे घेऊन लुटण्याचे प्रकार
पाटोदा : तालुक्यातील ग्रामीण परिसरात विविध भागांत खासगी प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. या वाहतुकीवर कोणाचेही नियंत्रण नाही. खासगी वाहनांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून जादा भाडे घेऊन लुटण्याचे प्रकार वाढत आहेत. ग्रामीण भागामध्ये बसेस सुरू नसल्याने प्रवाशांना नाईलाजाने खासगी वाहतुकीचा आधार घ्यावा लागत आहे, याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.