कासार समाजाचा शिरूर तहसीलसमोर मूक मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2018 12:07 AM2018-09-20T00:07:54+5:302018-09-20T00:08:28+5:30

देशाच्या लोकसंख्येत अत्यल्प असलेल्या कासार समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी व शासनाच्या सवलती प्राप्त होण्यासाठी भटक्या विमुक्त जातीच्या प्रवर्गामध्ये समाविष्ट करण्याची मागणी मंगळवारी मूक मोर्चाद्वारे करण्यात आली. याबाबत लेखी निवेदन घेण्यास तहसील प्रशासनातील अधिकारीच नसल्याने ते निवेदन आवक जावक विभागाकडे देण्यात आले.

A silent front in front of Shirpur Tehsil of Kasar community | कासार समाजाचा शिरूर तहसीलसमोर मूक मोर्चा

कासार समाजाचा शिरूर तहसीलसमोर मूक मोर्चा

Next
ठळक मुद्देतहसीलदारांना निवेदन : भटक्या प्रवर्गात समावेश करण्याची मागणी; तीव्र स्वरुपात लढा उभारण्याचा निर्धार

लोकमत न्यूज नेटवर्क
शिरुर कासार : देशाच्या लोकसंख्येत अत्यल्प असलेल्या कासार समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी व शासनाच्या सवलती प्राप्त होण्यासाठी भटक्या विमुक्त जातीच्या प्रवर्गामध्ये समाविष्ट करण्याची मागणी मंगळवारी मूक मोर्चाद्वारे करण्यात आली. याबाबत लेखी निवेदन घेण्यास तहसील प्रशासनातील अधिकारीच नसल्याने ते निवेदन आवक जावक विभागाकडे देण्यात आले.
महाराष्ट्रभर विखुरलेल्या या समाजाचे उदरनिर्वाहाचे साधन बांगडी किंवा भांडे विकणे एवढेच मर्यादित होते. आता या पारंपरिक व्यवसायात भांडवलदारांनी कब्जा मिळवल्याने आर्थिक कोंडीत समाज सापडला आहे. १९५१ च्या पहिल्या मागास वर्ग आयोगाने सादर केलेल्या आहवालात अति मागास असलेल्या जातीमध्ये कासार समाजाचा उल्लेख आहे. हा समाज कासार, कंचारी, कसेरा, ठटेरा, कैसरवाणी, तमेरा, बुगरी, काचारी, कंसारा,ओतारी, ओतनकर, तांबटकर अशा नावाने ओळखला जातो. राज्यात हा समाज सोमवंशीय क्षत्रीय, जैन कासार, वºहाडी कासार, तांबट कासार अशा पोटजातीत विभागला गेला असल्याने राज्यकर्त्यांचे फारसे लक्ष नसते. भटक्या जाती - ब वर्गात समावेश व्हावा यासाठी लढा देत आहे. १९९६ नंतर हा लढा थंडावला होता. आता नव्याने हा लढा सुरू करण्यात आला असून, ओतारी समाज समकक्ष असून देखील १९७७ मध्ये भटक्या -ब प्रवर्गात समावेश केला. मात्र, कासार समाज आजही ओ. बी. सी. प्रवर्गात आहे. जागतिक कासार समाज फाउंडेशनच्या माध्यमातून आता हा लढा तीव्र स्वरूपात उभारला आहे.
शासनाने गांभीर्याने घेऊन कासार समाजाचा समावेश भटक्या -ब प्रवर्गात करावा अशा मागणीचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले.
तहसील कार्यालयावर काढलेल्या या मूकमोर्चात अशोक दगडे, भाऊसाहेब गाडेकर या जे. के. एस. च्या पदाधिकाऱ्यासह अर्जुन गाडेकर, दत्ता पाटील, गोविंद पाटील, आतिश गाडेकर, जगन्नाथ भांडेकर, प्रमोद दगडे, सुधीर भांडेकर, संतोष भांडेकर, संदीप पाटील, संतोष भांडेकर, वाय. जी. गाडेकर, अमोल पाटील, नंदू भांडेकर, प्रकाश भांडेकर, राम दगडे, सागर दगडे, गोरख गाडेकर, विलास दगडे, गणेश भांडेकर, लक्ष्मण दगडे, दिनेश गाडेकर, नागेश गाडेकर, सचिन अंदुरे, सुशील गाडेकर, भोला दगडे, ऋषिकेश दगडे आदींची उपस्थिती होती.

Web Title: A silent front in front of Shirpur Tehsil of Kasar community

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.