आष्टीत आरोग्य कर्मचा-यांचा मूक मोर्चा, धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:35 AM2021-05-07T04:35:42+5:302021-05-07T04:35:42+5:30
आष्टी : बीड शहराजवळील च-हाटा फाट्यावर टाकळसिंग येथील वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्याला पोलिसांनी अमानुषपणे केलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ गुरूवारी (६ ...
आष्टी : बीड शहराजवळील च-हाटा फाट्यावर टाकळसिंग येथील वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्याला पोलिसांनी अमानुषपणे केलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ गुरूवारी (६ मे) आष्टी तालुक्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांनी तहसील कार्यालयावर मूक मोर्चा काढून धरणे आंदोलन केले. यावेळी कर्मचा-यांनी घोषणाबाजी करुन मारहाण करणा-या पोलीस अधिकारी, कर्मचारी यांना निलंबित करा, अशी मागणी करुन कर्मचा-यांनी काम बंद आंदोलनाचा इशारा दिला.
टाकळसिंग प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.विशाल वनवे बुधवारी सायंकाळी भावासोबत आष्टीला ड्युटीवर निघाले होते. यावेळी त्यांना पोलिसांनी च-हाटा फाटा येथे अडवून बेदम मारहाण केली होती. याच्या निषेधार्थ गुरुवारी दुपारी आष्टी तालुक्यातील सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन करून आष्टी तहसील कार्यालयावर मूक मोर्चा काढला. त्यानंतर तहसील कार्यालयाच्या आवारात जमलेल्या सर्व कर्मचाऱ्यांनी या अधिकाऱ्याला निलंबित करावे आणि त्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली. त्यानंतर आष्टी तहसीलदारांना आरोग्य कर्मचाऱ्यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.
यावेळी वैद्यकीय आरोग्य अधिकारी प्रसाद वाघ, डॉ. नितीन मोरे, डॉ.नारायण वायभसे, डाॅ. नितीन राऊत, डॉ.दत्ता जोगदंड, डाॅ. सचिन शेळके, डॉ. मझहर सय्यद, डाॅ. सचिन पाळवदे, डाॅ सुजाता रासकर, डाॅ.शुभांगी पैठणे, सुनिल गटाळ, नागेश कांरडे, शंकर वाळके, तालुकाध्यक्ष मोबीन सय्यद, आरोग्य कर्मचारी, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सहाय्यिका दोनशेच्या सुमारास कर्मचारी उपस्थित होते.
...
तुम्ही कामावर हजर रहा
मोर्चानंतर तहसिलदारांंनी प्रमुख वैद्यकीय आरोग्य अधिका-यांची बैठक घेतली. यावेळी अधिका-यांनी कारवाईची मागणी केली. कोरोनाच्या महामारीमध्ये तुम्ही काम बंद आंदोलन मागे घ्यावे. संबंधीत अधिकारी, पोलीस कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्यासंर्दभात जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांच्याकडे तुमचे निवेदन पाठविण्यात येईल. पण तुम्ही कामावर हजर रहावे, असे तहसीलदारांनी सांगितले.
....
===Photopath===
060521\img-20210506-wa0321_14.jpg~060521\img-20210506-wa0255_14.jpg