सिंदफनेला पूर; भालगावचा पूल पाण्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:36 AM2021-09-25T04:36:26+5:302021-09-25T04:36:26+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शिरूर कासार : तालुक्यातील सर्वात मोठी समजली जाणाऱ्या सिंदफना नदीच्या पाणलोटात गेल्या दोन, तीन दिवसांपासून जोरदार ...

Sindfanela flood; Bhalgaon bridge under water | सिंदफनेला पूर; भालगावचा पूल पाण्याखाली

सिंदफनेला पूर; भालगावचा पूल पाण्याखाली

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

शिरूर कासार : तालुक्यातील सर्वात मोठी समजली जाणाऱ्या सिंदफना नदीच्या पाणलोटात गेल्या दोन, तीन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. यामुळे आता खळाळून वाहत आहे. गुरुवारी झालेल्या पावसामुळे सिंधफना नदीला आलेल्या पुराने भालगाव रस्त्यावरील पुलावरून पाणी वाहू लागले.

काही वेळ या पुलावरून रहदारी बंद झाली होती. या वेळी नागरिकांना मोठ्या पुलावरून यावे लागत होते. शुक्रवारी सकाळी दहानंतर पाणी थोडे ओसरले. तर सावधगिरीने लोक हा पूल पाण्यातून वाट काढत पार करीत असल्याचे चित्र दिसत होते. पुलावर पाणी असताना पाण्यातून वाहन अथवा पायी जाण्याचे धाडस करू नका, असे आवाहन तहसीलदार श्रीराम बेंडे यांनी केले आहे.

240921\img20210924112902.jpg

शिरुरकासार तालुक्यातील भालगाव येथे सिंदफना नदीला पूर आला होता. यावेळी येथील पूल पाण्याखाली गेला होता. पाण्यातून वाट काढताना नागरिक.

Web Title: Sindfanela flood; Bhalgaon bridge under water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.