गाण्यामुळेच दीर्घायुष्य लाभले - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:36 AM2021-08-19T04:36:17+5:302021-08-19T04:36:17+5:30
बीड : ईश्वराजवळ पोहोचण्यासाठी संगीत हीच सर्वोत्तम साधना आहे. हेच माध्यम आनंद वाटण्यासाठी आणि माणसे जोडण्यासाठी मोलाचे आहे. गाण्यामुळे ...
बीड : ईश्वराजवळ पोहोचण्यासाठी संगीत हीच सर्वोत्तम साधना आहे. हेच माध्यम आनंद वाटण्यासाठी आणि माणसे जोडण्यासाठी मोलाचे आहे. गाण्यामुळे मी माणसे जोडली आणि गाण्यानेच मला निरामय दीर्घायुष्य लाभले. आगामी काळातही संगीत साधना करीत रसिक श्रोत्यांना गाणे ऐकवीत तृप्त करायचे आहे, अशी भावना संगीतरत्न भरत लोळगे यांनी व्यक्त केली.
बीडच्या सांस्कृतिक विश्वात गायन, वादन, अभिनय, चित्रपट निर्मिती यात मोलाचे योगदान देणारे संगीतरत्न भरत लोळगे यांचा स्वातंत्र्यदिनी शाल, श्रीफळ, पुष्पहार आणि मानपत्र देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. भरत लोळगे यांनी गेली सहा दशके रसिकांच्या मनावर आपल्या चतुरस्र गायकीने गारूड केले आहे. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून हा सत्कार करण्यात आला. प्रस्ताविक जिल्हाध्यक्ष प्रमोद वझे यांनी केले. राष्ट्रीय कीर्तनकार प्रज्ञाताई रामदासी, डॉ. वासुदेव निलंगेकर, जगदीश पिंगळे, महेश वाघमारे आणि सुरेश साळुंके यांनी मनोगत व्यक्त केले. मानपत्र वाचन दीपक बिल्पे यांनी केले. संतोष पारगावकर यांनी आभार मानले. कार्यक्रमास नगरसेवक विलास विधाते, सतीश सुलाखे, प्रकाश मानूरकर, प्रतिभा वाघमारे, स्नेहा पारगावकर, प्रा. राहुल पांडव, अशोका कुलकर्णी, लक्ष्मीकांत सौंदत्तीकर, लक्ष्मीकांत खडकीकर, अनंत सुतनासे, प्रा. दिलीप दोडके यांच्यासह संस्कार भारतीचे कलासाधक आणि नागरिक उपस्थित होते.