साहेब, सातव्या वेतन आयोगाचा लाभ मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:36 AM2021-09-26T04:36:36+5:302021-09-26T04:36:36+5:30

कार्यालयीन कामकाजासाठी पोलीस अंमलदारांना अधीक्षक कार्यालयात येण्याची आवश्यकता नाही. समाधान हेल्पलाईनवर केलेल्या प्रत्येक कॉलची नोंद स्वतंत्रपणे घेतली जाते. त्यानंतर ...

Sir, I did not get the benefit of the Seventh Pay Commission | साहेब, सातव्या वेतन आयोगाचा लाभ मिळेना

साहेब, सातव्या वेतन आयोगाचा लाभ मिळेना

Next

कार्यालयीन कामकाजासाठी पोलीस अंमलदारांना अधीक्षक कार्यालयात येण्याची आवश्यकता नाही. समाधान हेल्पलाईनवर केलेल्या प्रत्येक कॉलची नोंद स्वतंत्रपणे घेतली जाते. त्यानंतर तक्रारी संबंधित विभागांना कळवल्या जातात. महिला पोलीस अंमलदार सविता राठोड व विशाखा वाघमारे या हेल्पलाईनचे काम पाहतात.

...

कोणाला रजा नाही, कोणाला हवे शासकीय घर

समाधान हेल्पलाईनसाठी ९४२१७६३७३३ हा क्रमांक आहे. यावर फक्त पोलीस अंमलदार फोन करून आपल्या कार्यालयीन तक्रारी नोंदवू शकतात. काही जणांना घरात मुलगी, आई- वडील आजारी आहेत म्हणून रजा हवी असते तर काही जणांना शासकीय वसाहतीत घर पाहिजे असते. काही जण पोलीस अधीक्षकांशी संवाद व्हावा म्हणून आदेशित कक्ष (ओआर) मागून कैफियत मांडत असतात.

....

३७ तक्रारींचे निवारण

समाधान हेल्पलाईनवर आठ महिन्यांत आलेल्या ५८ पैकी ३७ तक्रारींचा निपटारा करण्यात यश आले. उर्वरित तक्रारींचे निवारण करण्याचे काम सुरू आहे. अनेकदा तक्रारींची सोडवणूक झाल्यावर कर्मचारी फोन करुन आभार मानतात तर संबंधितांना तक्रारींवर केलेल्या उपायांबाबतची माहिती देखील दिली जाते.

...

समाधान हेल्पलाईनवर सेवेत कार्यरत तसेच निवृत्त पोलीस अधिकारी व अंमलदार फोन करुन तक्रारी नोंदवतात. बहुतांश तक्रार कार्यालयीन कामकाजाबाबत असतात. अधिकारी-अंमलदारांना कार्यालयात हेलपाटे मारण्याची गरज भासत नाही. तक्रारींचा विनाविलंब निपटारा करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.

- आर. राजा, पोलीस अधीक्षक, बीड.

...

२०२१ मध्ये दाखल तक्रारी

जानेवारी ००

फेब्रुवारी ००

मार्च ०२

एप्रिल ९०

मे ०५

जून १३

जुलै १३

ऑगस्ट १६

Web Title: Sir, I did not get the benefit of the Seventh Pay Commission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.