सर्पदंशाने बहिणींचा मृत्यू; आईची प्रकृती चिंताजनक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:40 AM2021-09-09T04:40:43+5:302021-09-09T04:40:43+5:30

न्यूज नेटवर्क केज : पत्र्याचा घरात आईशेजारी झोपलेल्या दोन मुलींसह आईचा सापाने चावा घेतल्याने, उपचारादरम्यान दोन मुलींचा मृत्यू झाला, ...

Sisters die of snake bites; The mother's condition is critical | सर्पदंशाने बहिणींचा मृत्यू; आईची प्रकृती चिंताजनक

सर्पदंशाने बहिणींचा मृत्यू; आईची प्रकृती चिंताजनक

Next

न्यूज नेटवर्क

केज : पत्र्याचा घरात आईशेजारी झोपलेल्या दोन मुलींसह आईचा सापाने चावा घेतल्याने, उपचारादरम्यान दोन मुलींचा मृत्यू झाला, तर आईवर अंबेजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेत आईपासून काही अंतरावर झोपलेल्या दोन मुली वाचल्या आहेत. ही घटना बुधवारी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास केज तालुक्यातील सोनेसांगवी नं. २ येथे घडली.

स्वप्नाली दीपक साखरे (वय ४), स्विटी दीपक साखरे (३) अशी मृत झालेल्या मुलींची नावे आहेत. जयश्री दीपक साखरे (३०) यांच्यावर उपचार सुरू आहेत.

सोनेसांगवी नं. २ येथील दीपक साखरे हे कुटुंबासहित पत्र्याच्या शेडमध्ये राहतात. त्यांना चार मुली आहेत. ते नेहमीप्रमाणे पत्र्याच्या घरातील शेडमध्ये पत्नी व चार मुलींसह झोपी गेले. दोन मुली आईजवळ, तर दोन मुली बाजूला झोपल्या होत्या. बुधवारी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास बाहेरून घरात आलेल्या सापाने आईजवळ झोपलेल्या स्वप्नाली व स्विटी या दोघी बहिणींना सापाने चावा घेतला. मात्र त्यांना झोपेत काय चावले हे सांगता आले नाही. थोड्या वेळाने त्या झोपी गेल्या. मात्र त्याच वेळी सापाने मुलीची आई जयश्री साखरे यांना चावा घेतला. त्यांच्या पायाची आग होऊ लागली. त्याच वेळी हा विषारी साप दीपक साखरे यांच्या अंथरुणात गेल्याने त्यांच्या अंगास गार लागले. काहीतरी वळवळ करीत असल्याचे त्यांना जाणवल्याने त्यांना जाग आली. त्यांना अंथरुणात साप आढळून आला. या सापास दीपक साखरे व त्यांचे वडील बारीकराव साखरे यांनी मारले. मारलेल्या सापास घेऊन खासगी वाहनाने ते पत्नी व दोनी मुलींना घेऊन उपचारासाठी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान दोन्ही मुलींचा मृत्यू झाला.

...

हृदय पिळवटून टाकणारी घटना

दरम्यान, मृत झालेल्या मुलींची आई जयश्री साखरे यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृतीही चिंताजनक आहे. एकाच कुटुंबातील तिघांना सर्पदंश होऊन दोन चिमुकल्यांचा जीव गेला. ही हृदय पिळवटून टाकणारी घटना आहे; तर दोन बहिणी दूर झोपल्या असल्याने बचावल्या आहेत.

080921\img-20210908-wa0025.jpg~080921\1721-img-20210908-wa0024.jpg

याच घराचं चावला साप~मयत मुलगी

Web Title: Sisters die of snake bites; The mother's condition is critical

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.