सात हजारासाठी भावंडांचे अपहरण
By admin | Published: September 22, 2016 11:43 AM2016-09-22T11:43:41+5:302016-09-22T11:43:41+5:30
वघ्या सात हजार रुपयांसाठी मुकादमाने एका ऊसतोड मजुराच्या दोन मुलांचे अपहरण केल्याची घटना बीडमध्ये घडली.
Next
>ऑनलाइन लोकमत
बीड, दि. २२ - अवघ्या सात हजार रुपयांसाठी मुकादमाने एका ऊसतोड मजुराच्या दोन मुलांचे अपहरण केले. ही खळबळजनक घटना पानाची देवळाली (ता. आष्टी) येथे गुरुवारी उघडकीस आली.
भाऊसाहेब रामदास पिंपळे (११) व अनिता रामदास पिंपळे (९) अशी अपहृत भावंडांची नावे आहेत. रामदास सीताराम पिंपळे (रा. देवळाली पानाची) हे ऊसतोड मजुरी करुन कुटुंबाचा गाडा हाकतात. त्यांनी सागर भिकाजी टकले (रा. शेटफळ ता. करमाळा, जि. सोलापूर) आणि राजू गोपीनाथ गायकवाड (रा. खडकतवाडी ता. आष्टी) या मुकादमांकडून गतवर्षी उचल घेतली होती. दरम्यान, व्यवहारात रामदास यांच्याकडे मुकादमांचे सात हजार रुपये शिल्लक राहिले. त्यासाठी टकले व गायकवाड यांनी पिंपळेंंकडे तगादा लावला होता. बुधवारी ते दोघेही जीपमधून देवळालीत आले. त्यांनी सात हजार रुपयांसाठी पिंपळे यांचा मुलगा भाऊसाहेब व मुलगी अनिता यांना गाडीत टाकून त्यांचे अपहरण केले. पिंपळे यांनी त्यांच्याकडे दयायाचना केली; परंतु ते पैशासाठी आडून बसले होते. पिंपळे यांच्या फिर्यादीवरुन अंभोरा ठाण्यात रात्री उशिरा अपहरणाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी अपहृत भांवडांसह अपहरणकर्त्यांच्या शोधासाठी पथक रवाना केले आहे. मात्र, गुरुवारी दुपारपर्यंत त्यांचा थांगपत्ता लागला नाही.