मराठा क्रांती मोर्चाचे दुसऱ्या दिवशीही ठिय्या आंदोलन सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:22 AM2021-07-09T04:22:34+5:302021-07-09T04:22:34+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अंबाजोगाई : अंबाजोगाई पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यात चौकशीसाठी बोलावलेल्या एका प्रतिष्ठित व्यक्तीस पोलिसांनी बेदम ...
लोकमत न्यूज नेटवर्क
अंबाजोगाई : अंबाजोगाई पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यात चौकशीसाठी बोलावलेल्या एका प्रतिष्ठित व्यक्तीस पोलिसांनी बेदम मारहाण करून अर्वाच्च भाषेत जातीवाचक शिवीगाळ केली. या घटनेचा निषेध नोंदवत अंबाजोगाईचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील जायभाये यांच्यावर गुन्हा दाखल करावा. त्यांना सेवेतून निलंबित करा, या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने बुधवारी सुरू केलेले ठिय्या आंदोलन गुरुवारी सायंकाळी सुरूच होते.
अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात काही दिवसांपूर्वी ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्यात अंबाजोगाई शहरातील डॉ. सुहास यादव यांना जाणीवपूर्वक गुंतविण्यात आले आहे, असे उपजिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. डॉ. सुहास यादव यांचा शोध घेण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील जायभाये व त्यांचे सहकारी यादव कुटुंबीयांना जाणीवपूर्वक त्रास देत आहेत. मंगळवारी रात्री या प्रकरणाचा तपास करताना डॉ. यादव यांचे चुलत भाऊ विलास यादव यांना पोलीस अधिकाऱ्यांनी मारहाण केली. अर्वाच्च भाषा वापरली. यामुळे बुधवारपासून मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकाऱ्यांनी उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे, असे मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक अॅड. माधव जाधव यांनी सांगितले.
दरम्यान, बुधवारी सुरू झालेले आंदोलन गुरूवारी सायंकाळपर्यंत सुरूच होते. आंदोलनात नंदकिशोर मुंदडा, अशोक देशमुख, अशोक गुंजाळ, राजेसाहेब देशमुख, बबन लोमटे, हनमंत मोरे, सारंग पुजारी, डॉ. नंदकिशोर सोमवंशी, अॅड. बाळासाहेब पाटील, अॅड. अजित लोमटे, आबासाहेब पांडे, महेश लोमटे, प्रा. प्रशांत जगताप, संजय भोसले, वैजीनाथ देशमुख, प्रवीण ठोंबरे, अॅड. संतोष लोमटे, राहुल मोरे, प्रशांत आदनाक, गोविंद पोतंगले, ज्ञानोबा कदम, अॅड. रणजित सोळंके, बालाजी शेरेकर, रवीकिरण देशमुख, भीमसेन लोमटे, विजयकुमार गंगणे, विजय भोसले, अंगद गायकवाड, धर्मराज सोळंके, स्वप्निल सोनवणे, लहू शिंदे, बाळासाहेब शिंदे, राणा चव्हाण, प्रकाश बोरगावकर, अॅड. प्रशांत शिंदे, अभिजीत लोमटे, अॅड. भागवत गाठाळ, ईश्वर शिंदे, रणजित डांगे, श्रीकांत कदम, अतुल जाधव, महेश जगताप, राजकुमार गंगणे, संजय कदम व मराठा समाजाचे कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.
...
आंदोलनाची व्याप्ती वाढली.
उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या या ठिय्या आंदोलनाची व्याप्ती आता वाढली आहे. आंदोलनात विविध संघटना सहभागी होत आहेत. बीड जिल्ह्यात सर्वत्र आंदोलनाचे लोण पसरले असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक अॅड. माधव जाधव यांनी दिली.
080721\img-20210708-wa0121.jpg
अंबाजोगाई येथे सुरू असलेले आंदोलन